नाशिक

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा .बबनराव घोलप यांचा 10 ऑक्टोबर वाढदिवस त्यानिमित्ताने …
पाच वेळा आमदार राहिलेल्या मा .बबनराव घोलप यांची राजकिय कारकिर्द मोठी आहे .मा .बबनराव घोलप माजी समाजकल्याणमंत्री आहे .महिला व बालकल्याण ही महत्वाची खाती,तसेच समाजकल्याण ,माजी सैनिकांचे कल्याण ,अशा महत्वाच्या खात्यांचा मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे .महिलांसाठी 33%आरक्षण देऊन स्वतंत्र बजेट मांडले .चीन या देशाच्या बिजिंग येथे अर्थसंकल्प मांडणारे जगातील पहिले मंत्री ठरले .खत्री आयोगाची स्थापना ,भटक्या जमातीची अ ,ब ,क ,ड अशी विभागणी करुन त्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून दिला .शासनाच्या माध्यमातून 350आश्रमशाळा,300वसतिगृहे 6 सुतगिरण्या ,व 400वृध्दाश्रम नानांनी दिले . लहानपणापासून गरीबीचे चटके सहन खाल्ल्याने सामाजिक झळ पचविल्याने व जगण्यासाठी संघर्ष करत नाना मोठे झाले .समाजकल्याण मंत्री या संधीचा उपयोग करत त्यांनी सर्वप्रथम विखुरलेला आपला समाज एकत्र केला .देशभर दौरा करुन आपला समाज एकत्र करण्याची हातोटी त्यांच्यात आहे .छोट्या मोठ्या 200संघटना विसर्जित करुन राष्ट्रीय चर्मकार संघाची स्थापना केली .आज या संघटनेचे देशपातळीवर हजारो पदाधिकारी व लाखो कार्यकर्ते आहेत .महाराष्ट्रातील खेडोपाडी संघटना पोहोचली आहे . आज 10ऑक्टोबर रोजी नानांचा वाढदिवस देशभर मोठ्या उत्साहाने अत्यंत साध्या पध्दतीने साजरा होत आहे .दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण,मतिमंद विद्यार्थी खाऊ वाटप ,शालेय उपयोगी वस्तुंचे वाटप ,रक्तदान इ .उपक्रमांनी साजरा होत असतो .या वर्षी अतिपावसामुळे शेतकरी राजा संकटात आहे ,म्हणून वाढदिवस अत्यंत साध्या पध्दतीने करण्याचे आवाहान त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे .वाढदिवशी होणार्या खर्चाचा वापर त्यांनी शेतकर्यांच्या मदतीसाठी करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे .कायमस्वरुपी समाजाचाच विचार करणार्या नानासाहेबांना समाजसेवेसाठी निरोगी उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना !यापुढील आयुष्यही असेच आनंदी,प्रसन्न ,व सर्वागिण भरभराटीचे जावो याच सदिंच्छांसह वाढदिवसाच्या मोरपंखी खूप खूप शुभेच्छा!
शुभेच्छुक -नाशिक जिल्हा सचिव -श्री .दादा पठाडे सर ,राष्ट्रीय सचिव श्री .दत्तात्रय गोतिसे साहेब ,जिल्हाध्यक्ष -श्रावण वाघ सर ,राज्यसचिव श्री .अनिल कानडे ,शहराध्यक्ष श्री .विष्णू लोहकरे सर ,नाशिक पश्चिम अध्यक्ष श्री .शरद पवार .नाशिक ग्रामिण अध्यक्ष श्री .प्रदिप अहिरे सर ,व नाशिक शहर व जिल्हा पदाधिकारी .
शुभेच्छुक -श्री .दादा पठाडे सर .
सेवानिवृत्त शिक्षक .
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




