best news portal development company in india

शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत न्याय मिळावा अन्यथा रस्ता रोको व उपोषण करण्यात येईल- प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलास भाऊ दातीर….

SHARE:

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर

      सिन्नर:प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने सिन्नर तहसीलदार निवेदन देण्यात आले. सिन्नर तालुक्या मध्ये पावसामुळे नुकसान झालेले असून पिके पिवळी पडलेली व भरपूर प्रमाणात सडलेले आहे, शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झालेले आहे, त्याचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

   आज तालुक्यातील शेतकरी अडचणीत आहे, त्यांना एकरी 1 लाख रुपये भरपाई मिळावी ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळावी शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत न्याय मिळावा न्याय नाही मिळाल्यास रस्ता रोको व उपोषण करण्यात येईल अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलास भाऊ दातीर व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत डावरे, उपाध्यक्ष पांडुरंग आगळे, प्रहार ओबीसी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड, शहराध्यक्ष संगीता आगळे, तालुकाध्यक्ष पुष्पाताई भोसले,  गणेश थोरात ,गोपाळ गायकर, प्रकाश थोरात ,गणेश मस्के, सुनिल जगताप ,विलास खैरनार, सुनील वाघ, गोविंद सहाणे, भास्कर दराडे, रोशन उगले ,दत्ता लोंढे, योगेश कहाडळ, पंकज पेटारे,अनिल गवांदे या वेळी उपस्थित होते. तसेच या बाबत माननीय तहसीलदार साहेब यांना मागणीचे निवेदन  देण्यात आले.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई