लासलगाव:29/9/25
लासलगाव: जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत आयशर पिकअपसह शासकीय रेशन धान्याचा सुमारे २५ लाख ७ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा विंचूरमध्ये येत कारवाई करत २५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करते मात्र लासलगाव पोलिसांना याबाबत माहिती होत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 27 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजता विंचूर–निफाड रोडवरील देवकी लॉन्सजवळ स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीणचे पथक गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. आरोपी राहुल राजेंद्र कर्पे (वय 35, रा. पांडुरंग नगर, विंचूर, ता. निफाड) हा दोन वाहनांमध्ये शासकीय रेशनसदृश गहू-तांदळाची अवैधरित्या वाहतूक करताना पोलिसांच्या हाती सापडला.
यात जप्त आयशर टेम्पो (क्र. MH-15 JC-9117) किंमत 15 लाख रुपये,200 पोते तांदूळ (85 पोत्यांवर महाराष्ट्र शासनाची अधिकृत मुद्रा), एकूण किंमत 3.60 लाख रुपये,मोठा लोखंडी इलेक्ट्रॉनिक वजन काटा, किंमत 2 हजार रुपये,महिंद्रा पिकअप (क्र. MH-15 GV-9117) किंमत 6 लाख रुपये,45 पोते गहू, किंमत 45 हजार रुपये असे एकूण जप्त मालाची किंमत अंदाजे 25 लाख 7 हजार रुपये इतकी आहे.पोलिसांच्या चौकशीत समोर आले की, शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीतून (PDS) लाभार्थ्यांना देण्यात येणारे तांदूळ व गहू आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवले होते. या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 अन्वये फिर्यादी सचिन धारणकर,स्थानिक गुन्हे शाखा नाशिक यांच्या फिर्यादी वरून गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




