प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
सिन्नर:29/9/25 महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा जोरदार तडाका सुरू आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून परतीच्या पाऊस लांबणीवर पडला असल्याने राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी व मुसळधार पावसाने झोडपले आहे.. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून घासातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे… हतबल झालेला शेतकरी आधार व मदतीच्या प्रतिक्षेत आहेत…
परंतु शासकीय नियम व अटी आणि शर्ती लागू करण्यात वेळ लागतो तोपर्यंत शेतकरी आधाराची वाट पाहाता पाहाता त्यांच्या हातात फक्त कार्ड च शिल्लक आहेत., आधार मागायचा कुणाला…
सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असल्याने सिन्नर तालुक्यातील पुर्व पश्चिम भागात पावसाचा धुवांधार कोसळणारा पाऊस सुरू असुन जोर मात्र कायम आहे.. सोयाबीन व मका. कांदा टोमॅटोचे पीक पुर्ण उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी सरकारी मदतीची याचना करीत आहेत….
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील सर्व च भागात पावसाने थैमान घातले आहे.. त्यामुळे नदी नाले व ओढे ओसंडून वाहू लागले आहेत… जामनदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.. वावी ते मिठसागरे रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून धोकादायक प्रवास करत वाहनचालक प्रवास करत आहे…





Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




