नाशिक
प्रतिनिधी: ज्ञानेश्वर सांगळे,एवन न्यूज महाराष्ट्र,नाशिक
सध्या नाशिकमध्ये खड्ड्यांचे मोठे साम्राज्य असून नाशिक शहराला पूर्ण खड्ड्यानि विळखा घातला आहे. पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचाही मोठे प्रमाण वाढले असून बहुसंख्य नागरिकांचा बळी जात आहे. यामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे नाशिक रहिवासी त्रस्त झाले आहे.
नाशिक मध्ये पडलेल्या खड्ड्यामुळे आज 26 9 2025 रोजी झालेल्या रिक्षा चालकाचा खड्डा चूकविण्याच्या नादात रिक्षा पलटी झाल्यामुळे रिक्षा चालकाचा मृत्यू झाला.यामुळे सर्वत्र शोककाळा पसरली आहे.

सविस्तर वृत्त असे की,आज दिनांक 26 9 2025 रोजी रिक्षाचालक सुनील दत्तू पाटील,वय वर्ष- 55,राहणार- फुलेनगर,पेठ रोड,नाशिक. हे रिक्षा क्रमांक MH-15- FU- 1174 ही रासबिहारी मेरी लिंक रोडने जात असताना तोरणे हॉस्पिटल जवळील खड्डा वाचविण्याच्या नादात रिक्षा पलटी झाल्याने रिक्षा चालक गंभीर जखमी झाला.
नाशिक शहरात असे अनेक अपघात होत असून खड्ड्यांमुळे बळी जात आहे. या खड्ड्याच्या निषेधार्थ नागरिकांनी संताप व्यक्त असून यावर सरकार काही उपाययोजना करेल का असा प्रश्न नागरिक करत आहे.
सदरील परिसरातील नागरिकांनी झालेल्या रिक्षाचालकाच्या अपघाताजवळ धाव घेऊन परिस्थिती पाहता नागरिकांनी म्हसरूळ पोलीस स्टेशन व 108 ॲम्बुलन्स यांना संपर्क केला संपर्क केल्या असता पोलीसही त्वरित दाखल झाले. व 108 ॲम्बुलन्स ही दाखल झाली चालकाला डॉक्टरांनी तपासल्यानंतर डॉक्टरांनी रिक्षाचालक सुनील पाटील हे मयत झाल्याचं घोषित केले.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





