प्रतिनिधी:काळू पोटिंदे:नाशिक – ११/१०/२०२५
आम्ही नाशिकचे नागरिक आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.आपल्या नाशिक शहरांमधून ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेली गोदावरी नदी जाते.या नदीवर पंचवटी परिसरात रामकुंड हे ठिकाण आहे आणि इथे रामकुंड असल्याने या ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरत आलेला आहे,भरणार आहे.
परंतु खेदाची बाब आणि शोकांतिका अशी की दरवर्षी शहरातून जाणाऱ्या या गोदावरी नदीचे प्रदूषण,अस्वच्छता ही नेहमीचीच बाब राहिलेली आहे. नाशिक महानगरपालिका, राज्य सरकार ,केंद्र सरकार या नदीच्या स्वच्छतेसाठी ,प्रदूषणमुक्तीसाठी दरवर्षी खर्च करत असते.


तरीही पूर्णपणे अस्वच्छता आणि प्रदूषण का?हा नागरिकांच्या मनात प्रश्न आहे. या नदी प्रवाह मध्ये अनेक नागरिक वेगवेगळ्या प्रकारच्या केरकचरा असेल किंवा जुनी झालेली फुलांचे हार, निर्माल्य आणि आपण आता बघतोय की गणपती उत्सवानंतर दहाव्या दिवशी येथे तर नागरिकच प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माल्यरुपी केर कचरा,घाण टाकतात.
तसेच नवरात्र नंतर ही वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू,साहित्य या नदीमध्ये सोडून दिले जातात.
आणि ते नदीकिनारी येतात. प्लास्टिकचाही मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. तरीही पावसाळा आल्यास पावसामध्ये पूर येऊन बराच कचरा नदी प्रवाहामध्ये वाहत पुढे धरण क्षेत्राकडे जातो.
परंतु काही कचरा हा नदीकिनारी थांबून राहत असल्याचे दिसून येते. येत्या एक-दोन वर्षात कुंभमेळा आहे आणि आज आपण इथली गोदावरी नदी किनारी पंचवटी मध्येच रामकुंडापासून अवघ्या 300-400 मीटर परिसरामध्ये जिथे महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीने गोदापार्क व गोदा वाॅक वे हा छान प्रकल्प बनवलेला आहे.


पण या प्रकल्पामध्ये आणि बाजूला नदीकिनारी जी अस्वच्छता आहे, केरकचरा आहेत, प्लास्टिक निर्माण यामुळे नदी किनारे दूषित होत आहे. म्हणूनच आम्ही या शहराचे नागरिक म्हणून सामाजिक जाणीव ठेवत आज शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी, कर्मचारी यांच्या समवेत आणि आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून या नाशिक शहराचे “स्वच्छता दूत” म्हणून नरेंद्र मोदी यांनी गौरव केलेले श्री. चंद्रकांत पाटील, श्री. दत्तू बोडके, श्री.श्याम गोसावी, श्री.निवृत्ती धात्रक, श्री.जिभाऊ शेवाळे यासह विविध नागरिक यांनी एकत्र येत परिसरात पडलेला प्लास्टिक व इतर कचरा साफसफाई करण्याची मोहीम करून भरपूर कचरा काढण्यात आला आहे.
जसे कुंभमेळ्याच्या दरम्यान इतर इन्फा स्ट्रक्चरवर मोठ्या प्रमाणात खर्च होणारच आहे.
परंतु ज्या ठिकाणी कुंभमेळा होणार आहे त्या नदीवर योग्य प्रकारे साफसफाई स्वच्छता असावी. प्रदूषण होऊ नये,सांडपाणी मिसळू नयेत.
औद्योगिक वसाहतीतील कंपनीचे पाणी जाऊ नये .
आणि स्वतः नागरिकांनीही या ऐतिहासिक नदीचे महत्व जपत कुठल्याही प्रकारचे निर्माल्य टाकू नये,प्लास्टिक कचरा फेकू नयेत.
आपल्या उत्सवानंतर घरातील केरकचरा, निर्माल्य आपण कुठेही टाकू नये .
अशी आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून नागरिकांना ही आवाहन करतो, विनंती करतो आणि विशेष म्हणजे आम्ही या अगोदर माननीय आयुक्त ,महानगरपालिका, नाशिक यांना भेटून एक निवेदन दिलेले आहे, की नाशिक शहरात जो नदीचा प्रवाह जातो तर नाशिक शहरातील औद्योगिक वसाहती मधील ज्या मोठ्या- मोठ्या औद्योगिक कंपन्या आहे, त्या कंपन्यांकडून आपण सी.एस.आर. निधीतून किलोमीटर प्रमाणे त्यांच्याकडून वर्षभरामध्ये साफसफाई,स्वच्छता म्हणून राबवत गेले तर महानगरपालिकेचा ताण वाचेल आणि नदी स्वच्छ राहील, प्रदूषण होणार नाही.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




