

प्रतिनिधी नाशिक
24 सप्टेंबर 1995 रोजी संघाची स्थापना मा.श्री .बबनराव घोलप यांनी केली .अराजकीय सामाजिक संघटना चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी व समाजाच्या सर्व घटकांसाठी प्रभावी विधायक कामकाज करत आहे .प्रत्येक जिल्ह्यात ,तालुक्यात ,गावोगावी संघाच्या शाखा कार्यरत आहे .
संघ विविध कार्य करत असते यामध्ये गुणवंत विद्यार्थी ,अधिकारी ,कर्मचारी ,शिक्षक ,डाॅक्टर,इंजिनिअर ,वकील ,उद्योजक,व्यापारी ,साहित्यीक इ .यांचा सत्कार समारंभ आयोजित केला जातो . तसेच विविध प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम संघ आयोजित करत असतो .संत शिरोमणी रविदास जयंती ,छत्रपती शिवाजी महाराज जयंती,महात्मा फुले जयंती,राजश्री शाहूमहाराज जयंती ,भारतरत्न डाॅ .बाबासाहेब जयंती ,26 जानेवारी प्रजासत्ताक दिन,1मे महाराष्ट्र दिन,15ऑगष्ट स्वातंत्रदिन ,अशाप्रकारचे कार्यक्रम मा.अध्यक्ष यांच्या आदेशान्वये साजरे होत असतात .व समाजातील मुले,मुली,युवक,युवती हे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून गावोगावी समाजबांधवांची भेट घेऊन माहिती देणे व त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन संघाचे पदाधिकारी करत असतात.मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देणे,शाळा काॅलेजात प्रवेश मिळण्यासाठी मार्गदर्शन करणे ,विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेशासाठी मार्दर्शन करणे,अभ्यासिका,व्यायाम शाळा इ .प्रवेशासाठी मार्गदर्शन करणे तांत्रिक ट्रेनिंगसेंटर ,आयटीआय ,वैद्यकिय ,इंजिनिअरिंग इ .प्रवेशासाठी संघ मार्दर्शन करत असतो .प्रशिक्षित तरुण ,तरुणींना नोकरीसाठी तसेच उद्योगधंद्यासाठी विभागीय मेळावे घेऊन मार्गदर्शन करणे .बहुतेक ठिकाणी आपल्या समाजातील बांधवांवर ,भगिनींवर सामाजिक अन्याय अत्याचार होत असतो ,अशावेळी घटनास्थळी भेट देऊन मा .अध्यक्ष यांचे मार्गदर्शनाखाली समाजबांधवांना धीर देणे तसेच कायदेशीर कार्यवाहीसाठी मदत करणे .समाजातील सर्व घटकांना सर्व प्रकारच्या अडीअडचणींवर मदत व मार्गदर्शन करणे घटस्फोट,आपसातील भाऊबंदकी,ॲट्राॅसिटी कायदा ,कर्मचारी पदोन्नती ,निलंबन,इ .कायदेशीर मदत करणे .शासनाच्या योजनांची माहिती देऊन आर्थीक मदत मिळवून देणे,वधूवर सूचक व सामुदायिक विवाहांचे आयोजन करणे .इ .कार्य संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा .श्री .बबनराव घोलप ,राष्ट्रीय सचिव मा .दत्तात्रेय गोतिसे साहेब ,राज्यसचिव श्री .अनिल कानडे,नाशिक शहराध्यक्ष श्री .विष्णू लोहकरे सर,जिल्हाध्यक्ष -श्रावण वाघ सर,कार्याध्यक्ष -श्री .अमोल म्हैसधुणे साहेब,उत्तर.महाराष्ट्र अध्यक्ष श्री .प्रकाश पवार ,नाशिक पश्चिम विभाग अध्यक्ष श्री .शरद पवार ,नाशिक जिल्हासचिव श्री .दादा पठाडे सर ग्रमीण जिल्हाध्यक्ष,श्री .प्रदिप अहिरे ,युवा जिल्हाध्यक्ष .नाशिक श्री निकितेश धाकराव,उत्तमशेठ खैरनार ,स॔तोष धाकतोडे,श्री .मधुकर वाघ,सौ .रेखाताई गोतिसे मॅडम ,नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख श्री आनंदा महाले,,साई अक्षदा विवाह मंडळ अध्यक्ष श्री .साहेबराव घोलप व इ .पदाधिकारी करत असतात
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





