गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही केंद्र सरकारने त्वरित ” अनुदान ” द्यावे.. खा, राजाभाऊ वाजे — !
सध्या महाराष्ट्रात कांद्याचे दर घसरले आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणींत आला आहे. प्रचंड खर्च व मेहनत घेऊन पिकविलेल्या कांद्याचे भाव पडल्याने, कांद्याने केला वांदा ,,, पिकविलेल्या कांद्याचे उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही अशी परिस्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. सातत्याने पाठपुरावा करून ही केंद्र सरकार पाहिजे तसा प्रयत्न करत नाही असे दिसते परंतु राज्य सरकारने याबाबत हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या हितासाठी काही महत्त्वाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी वेळ वेळकाढूपणा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची थट्टा केली जात तर नाही ना याची सल मनात कायम राहिल्याने शेतकरीवर्गात मोठा रोष व्यक्त केला जात आहे..


संकाटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला व कांदा पिकाला हमी भाव मिळावा अशी अपेक्षा आहे परंतु सरकार याबाबत मनस्थितीत दिसत नाही त्यामुळे महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकारने याबाबत हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या कांद्याच्या मालाला अनुदान द्यावे.. अशी मागणी नाशिक चे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. कांद्याला त्वरित अनुदान द्यावे – खासदार राजाभाऊ वाजे
सध्या कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत.गुजरातमध्ये कांद्याला अनुदान मिळते, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही केंद्र सरकारने त्वरित कांद्याला अनुदान द्यावे, अशी आमची ठाम मागणी आहे.शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आम्ही सातत्याने आवाज उठवत राहू.
— खासदार राजाभाऊ(पराग) प्रकाश वाजे.नाशिक
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





