महाराष्ट्रातील १ लाख होमिओपॅथिक डॉक्टरावर होणाऱ्या अन्याय विरुद्ध तहसीलदार यांना निवेदन…
प्रतिनिधी =गणेश ठाकरे लासलगाव
लासलगाव:महाराष्ट्र राज्य विधानमंडळात पारित करण्यात आलेल्या कायद्यानुसार CCMP (certificate course in modern pharmacology) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे या अंतर्गत होमिओपॅथिक डॉक्टरांना आधुनिक वैद्यक उपचार करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले व कायद्याच्या आधारे mmc नोंद करण्याचे तरतूद करण्यात आली होती प्रक्रिया सुरू होत असताना IMA (INDIAN MEDICAL ASSOCIATION) यांच्या चुकीच्या अक्षय व खोटे आरोपांमुळे ही नोंदणी स्थगित करण्यात आली आहे. ही स्थिती ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम करणारी आहे. आजही ग्रामीण आरोग्य सेवेत सर्वाधिक प्रमाणात होमिओपॅथिक डॉक्टर्स सेवा देत आहेत. जर त्यांचे हक्क व कायद्याने मिळणारी मोजणी मिळाली नाही, तर याचा थेट फटका ग्रामीण जनतेला बसणार आहे म्हणून नासिक जिल्हा होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशन यांच्या वतीने प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या माध्यमातून शासनाला निवेदन देण्यात आले आहे.
नाशिक जिल्हा होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनचे अशी मागणी आहे की, CCMP डॉक्टरांची MMC मध्ये नोंदणी सुरू करण्यात यावी व त्यांच्या हक्काचे संरक्षण मिळावे.
होमिओपॅथी डॉक्टर्स यांना जे हक्क मिळालेले आहे ते नाकारले गेले तर
MCH प्रशासक डॅा बाहुबली शहा हे ऊपोषण करणार आहेत असे सांगण्यात आले.
याप्रसंगी नाशिक जिल्हा होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी व निफाड तालुक्यातील लासलगाव विंचूर निफाड चांदोरी सायखेडा ओझर येथील डॅा विलास कांगणे डॅा कैलास पाटील डॅा स्वप्निल जैन डॅा शैलेश काळे डॅा शरद दळवी डॅा अनिल बोराडे डॅा विशाल जाधव डॅा नारायण लोखंडे डॅा दिलीप तासकर डॅा राजेश कांगणे डॅा मनोज ठोके डॅा सचिन जांगडा डॅा रोटे डॅा राहुल घायाळ डॅा विकास चांदर डॅा सुजीत गुंजाळ डॅा संगिता सुरसे डॅा मनिषा पलोड डॅा ज्योती गांगु्डे डॅा वैशाली पवार डॅा भाग्यश्री सोनावणे व बहुसंख्य डॉक्टर उपस्थित होते.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......








