best news portal development company in india

दिव्यांग बांधवांना सहानुभूती, नाहीतर भक्कम साथ देऊया-खासदार भास्कर भगरे(सर)

SHARE:

निफाड येथे सामाजिक न्याय विभाग केंद्र सरकार व पंचायत समिती निफाडचे वतीने दिव्यांग तपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन..

 प्रतिनिधी, गणेश ठाकरे लासलगाव

लासलगाव:-दिनांक 11 जुलै रोजी वैनतेय विद्यालय निफाड येथे दिंडोरी मतदार संघाचे खासदार भास्करराव भगरे सर यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय वयश्री योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची व दिव्यांग व्यक्तींची पूर्व तपासणी व नोंदणी शिबिर कार्यक्रमाघे आयोजन सामाजिक न्याय विभाग केंद्र सरकार व पंचायत समिती निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने मा.खासदार श्री.भास्कराव भगरे सर दिंडोरी मतदार संघ,यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते.

(व्हिडिओ बातमी बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा)

https://youtu.be/BKkccb0fcSw?si=fHZL2DFXhRluPae9

  या मध्ये निफाड तालुक्यातील 300 लाभार्थ्यांनी तपासणी करून नोंदणी केल्याचे विकास अधिकारी नम्रता जगताप यांनी सांगितले.

   दिव्यांग व्यक्तींना आरोग्याची तपासणी करून आवश्यक असणारे साहित्य यावेळी वाटप करण्यात आले. या शिबिरासाठी राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत जेष्ठ नागरिकांचीही तपासणी करून आवश्यक साहित्य साठी नोंदणी करण्यात आली. 

   यावेळी डॉ. विजय मारकर व डॉ. रामकुमार सिंग यांनी योजनेबाबत सविस्तर माहिती व योजनेचे नियम व लागणारी कागदपत्रे यावर माहिती देण्यात आली. 

  तसेच विविध पदाधिकारी यांनी दिव्यांग बांधवांच्या शिबिरा बाबत आपले मत व्यक्त केले. निफाड पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी नम्रता जगताप यांनी दिव्यांग बांधवांच्या शिबिरासाठी सर्व सोयी उपलब्ध करून दिले.

  या कार्यक्रमासाठी निफाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील ,विस्तार अधिकारी संजय पवार,प्रशांत बोरसे,राजेश थोरात व ग्रामसेवक युनियन यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.

 या कार्यक्रमासाठी दिंडोरी मतदार संघाचे .खासदार श्री.भास्कर भगरे सर, वैनतेय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यवहारे सर, Alimco चे डॉ.विजय प्रकाश मारकर , विक्रम रंधवे, मधुकर शेलार, दिलीप कापसे ,, मधुकर राऊत,मटाले मामा, धुमाळ साहेब, सुहास सुरळीकर, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, सहायक गटविकास अधिकारी श्री.सुनील पाटील विस्तार अधिकारी, श्री.संजय पवार, श्री.राजेश थोरात, बोरसे श्रीम.सोनवणे मॅडम प्राचार्य वैनतेय विद्यालय श्री.बर्डे सर,गुंजाळ सर आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते

तसेच या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत अधिकारी , पंचायत समितीचे कक्ष अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक चालक, रोजगार सेवक, आरोग्य विभाग, अशा सेविका व दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते..

कार्यक्रमामध्ये पंचायत समिती व ग्रामपंचायत अधिकारी यांनी चहा पान नाश्त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. 

सूत्रसंचालन श्री. सोनार यांनी केले तर आभार श्री.सुनील पाटील साहेब यांनी केले.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई