मळ्यांमध्ये वीजपुरवठा नियमित करावा,स्थायी रहिवास असलेल्या शेतवस्त्यांना घरगुती कनेक्शन द्यावे. वीजपुरवठा सोलरद्वारे किंवा ट्रान्सफॉर्मर वाढवून द्यावा…

प्रतिनिधी चांदवड:-गाव आणि शहरांमध्ये २४ तास अखंड वीजपुरवठा होत असताना, शेतकरी व मळ्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अद्यापही अंधारातच जीवन कंठावे लागत आहे. शेतात दिवसरात्र मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी लाइट नसल्यानं अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. मळ्यांवर वस्ती असतानाही वीज नाही, याकडे शासनाचे व वीज वितरण कंपन्यांचे दुर्लक्ष होत आहे.
“मळ्यात माणसं राहत नाहीत का?” असा थेट सवाल आता शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. शेतमळे म्हणजे केवळ शेतीसाठीच नव्हे, तर अनेक कुटुंबांची वास्तव्याची जागा बनली आहे. रात्रीच्या वेळेस सुरक्षेच्या दृष्टीने लाइट अत्यावश्यक आहे. वन्य प्राण्यांचा धसका, चोरी, अपघात अशा समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.
वीज वितरण कंपन्या शेतकरी पंपसाठी वेळेवर लाइट देत नाहीत, त्यात मळ्यांमध्ये राहण्यासाठी लागणाऱ्या वीज कनेक्शनसाठी अनेक तांत्रिक आणि प्रशासनिक अडचणींचा सामना करावा लागतो.
शासनाने एकीकडे “स्मार्ट गाव”, “स्मार्ट शेती” यांसारख्या घोषणा केल्या असल्या, तरी प्रत्यक्षात शेतकरी अंधारातच राहतोय, हे विदारक वास्तव आहे.
स्थानिक नागरिकांची मागणी:
मळ्यांमध्ये वीजपुरवठा नियमित करावा
स्थायी रहिवास असलेल्या शेतवस्त्यांना घरगुती कनेक्शन द्यावे
वीजपुरवठा सोलरद्वारे किंवा ट्रान्सफॉर्मर वाढवून द्यावा
शेतकऱ्यांसाठी वीजदरात सवलत द्यावी
शासन व संबंधित विभागांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मळ्यांमध्ये माणसे राहतात, त्यांनाही जगायला उजेड लागतो. विकासाच्या गप्पा करताना, खऱ्या अर्थाने देश पोसणाऱ्या शेतकऱ्याच्या घरात मात्र अंधार का? असा सवाल शेतकऱ्यांनी केला…
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





