best news portal development company in india

त्रंबकेश्वर नाशिक परिसरात दोन दिवसाच्या सतत चालणाऱ्या पावसामुळे गोदावरीला पूरपरिस्थिती,रामकुंड येथील दूतोंड्या मारुतीच्या कमरेला पाणी…..

SHARE:

 

त्र्यंबकेश्वर-नासिक येथे सुरू असलेल्या दोन दिवसातील सततच्या पावसाने गोदावरी नदीला पूर परिस्थिती,दूतोंड्या मारुतीच्या कमरेला पाणी….

नाशिक:-नाशिक-त्रंबकेश्वर परिसरामध्ये काल सकाळपासून सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गंगापूर धरणातून ३७२१ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरातील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीत येत असल्यामुळे गोदावरी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज दि.५ रोजी पंचवटी रामकुंड येथे गोदावरी नदीच्या पात्रात असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी होते.तसेच सर्वत्र जलमय परिस्थिती झाली आहे. अधिक जोरदार पाऊस झालाच तर यापुढे गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने पाणी सोडले जाणार आहे.

  परिसरातील लहानमोठ्या नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी हे थेट गोदावरी नदीला मिळते आहे.म्हणून गोदावरी नदीच्या पात्रात कमालीची वाढ झाली आहे. येथील पातळेश्वर मंदिर हे अर्धे पाण्याखाली गेले आहे.याशिवाय येथील बाजारपेठ परिसरात पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे. म्हणून भाजी विक्रेते,फळ विक्रेतांची दुकाने सुरक्षितस्थळी घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

यापुढे सुध्दा पाऊसाचा जोर कायम राहण्याचा इशारा दिला आहे. पावसात येथे प्रत्येक जण आप आपली काळजी घेत असल्याने रहदारीचे रस्ते व सर्वच रस्ते सामसूम दिसून येत आहे. सध्या येथे होत असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले आहे.गोदावरी नदीला पुराची परिस्थितीचा विचार करून मनपाच्या पंचवटी विभागाीय अधिकारी मदन हरिश्चंद्र,सहा अधिक्षक मंगेश वाघ,राष्ट्रीय फेरीवाला धोरण विभागाचे सहा.अधिक्षक राजेश सोनवणे,प्रकाश उखाडे,ईश्वर शेंडके,रवी शिंदे,अग्निशमन दलाचे संजय कानडे आदींनी रामकुंड ते तपोवन संगम वस्तीपर्यंत पाहणी करून आवश्यक सुचना दिल्या आहेत.

 सध्या होत असलेल्या जोरदार पाऊस आणि यापुढे जोरदार पाऊस होऊन महापूराची परिस्थिती लक्षात घेऊन नदीच्या काठावर तंबू पाल टाकून वसलेल्या वस्ती हलविण्यात येत आहे.याशिवाय लहानमोठ्या व्यवसायिकांना हलवून सतर्कतेचा इशारा व आवश्यक सुचना दिल्या जात आहे.यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष,मनपा आपत्ती व्यवस्थापन विभाग,अग्निशमन दल व पोलीस पथक,जिल्हा प्रशासकीय विभागाकडून नदीच्या काठावर लक्ष दिले जात आहे.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई