खासदार राजाभाऊ वाजे यांचा वर्षभरापासून नाशिक रोड ते द्वारका उड्डाणपुलासाठी प्रयत्न….
नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार खासदार राजाभाऊ वाजे यांचे प्रयत्न सुरू….
प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
नाशिक : नाशिकरोड ते द्वारका उड्डाणपूल तसेच नाशिक मेट्रो यांच्याबाबत मागच्या काही वर्षांमध्ये फक्त चर्चा घडताना दिसून येतात. तसेच, नेत्यांकडून याबाबत घोषणा देखील होत असतात, मात्र कुठेही ठोस असे उत्तर नाशिककरांना मिळताना दिसून येत नव्हते. मात्र खासदार राजाभाऊ वाजे यांनी निवडून येताच या दोन्ही प्रकल्पांसाठी पाठपुरवठा करायला सुरुवात केली आणि यामध्ये ठोस असे पावलं प्रशासनाच्या वतीने उचलण्यासाठी प्रशासनाकडे तगादा लावला. याचेच पुढचे पाऊल म्हणजे महामेट्रो आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यामधील समन्वयातून नाशिक रोड ते द्वारका उड्डाणपूल याचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी दोन्ही विभागांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडून होत आहे. या संदर्भात मंगळवारी (दि. १७) खासदार राजाभाऊ वाजे यांनी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री श्रवण हर्डीकर यांची भेट घेत याबाबत सविस्तर चर्चा केली. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार नाशिक रोड ते द्वारका उड्डाणपूल करत असताना त्याचं स्ट्रक्चर महारेलच्या दुमजली उड्डाणपुलाच्या अनुषंगाने करायचे असल्याने त्याबाबत महा मेट्रोचा ना हरकत याबाबत सविस्तर चर्चा झाली. श्री हर्डीकर यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत याबाबत सकारात्मकता दर्शवली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जर उड्डाणपूल करत असेल तर महा मेट्रो साठी जागा राखीव ठेवण्याची विनंती महा मेट्रोच्या वतीने केली जाईल असे यावेळी हर्डीकर यांनी सांगितले.

मेट्रोला देखील चालना: यावेळी झालेल्या बैठकीत नाशिक मेट्रोबाबत देखील सविस्तर चर्चा झाली आणि नाशिक मधील मेट्रो प्रकल्प पुढे नेण्यासाठी महा मेट्रो आग्रही असल्याचे देखील हळदीकर यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांना सांगितले. नाशिकसाठी प्रस्तावित असलेली मेट्रो ही एक वेगळ्या प्रकारची आधुनिक प्रणाली असणार आहे, जी थेट रस्त्यावर चालणारी “आर्टिक्युलेटेड बस मेट्रो” असेल अशीही माहिती यावेळी दिली.
ज्यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक रोड ते द्वारका या उड्डाणपुलासाठी नितीन गडकरी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यावेळी गडकरी यांना स्थानिक वस्तूस्थिती तसेच महामेट्रो च्या प्रकल्पामुळे उड्डाणपूल देखील रखडला असल्याची माहिती दिली असता त्या बैठकीत गडकरी यांनी अशी सूचना केली की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या माध्यमातून हा उड्डाणपूल उभारला जाईल. हा प्रकल्प उभारत असताना त्यावर डबल डेकर उड्डाणपूल करून वरील बाजूस मेट्रोसाठी जर जागा ठेवायची असेल तर महा मेट्रो कडून त्याबाबत ना हरकत तसेच मागणी आली तर आपल्याला हा प्रकल्प पुढे नेता येईल, त्यानंतर खासदार राजाभाऊ वाजे यांनी त्या दृष्टीकोनातून पावलं उचलायला सुरुवात केली. आता महा मेट्रो सोबत झालेल्या बैठकीनंतर पुढील बैठक नागपूर येथे होऊन नाशिक रोड ते द्वारका उड्डाणपुलाच्या कामाला कुठेतरी सुरुवात होईल अशी शक्यता दिसून येत आहे.
नाशिक रोड ते द्वारका किंवा नाशिक मेट्रो याबाबत मागच्या काही वर्षात फक्त घोषणा झाल्या तसेच मागणीचे निवेदन देण्यात आले. मात्र, कुठल्याही प्रकारे ठोस पाठपुरावा किंवा कामकाज याबाबत झालेले नव्हते. मात्र खासदार राजाभाऊ वाजे यांनी याबाबत वस्तुनिष्ठ पाठपुरवठा करून हे दोन्ही प्रकल्प नाशिक मध्ये कसे लवकरात लवकर येतील या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत.
नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर यांच्यात झालेल्या बैठकीत अनेक चर्चा झाल्या तसेच येत्या सोमवारी (दि.२३) नाशिक येथे महामेट्रोची विशेष बैठक घेण्याबाबत एकमत झाले.
महा मेट्रो राष्ट्रीय प्राधिकरण तसेच अनेक इतर अडचणींमुळे व राजकीय व प्रशासनिक अनास्थेमुळे हे दोन्ही प्रकल्प मूर्त स्वरूपात येत नाहीये असे मागील वर्षभरात दिसून आलेले आहे. त्यामुळे वस्तुनिष्ठ पाठपुरावा करून हे प्रकल्प कसे लवकरात लवकर मंजूर होतील त्यांना निधी उपलब्ध होईल आणि खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात होईल यासाठी युद्ध पातळीवर पाठपुरावा केला जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील मागील तीन बैठकांमध्ये नाशिक रोड ते द्वारका या उड्डाणपुलाबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. आशा आहे की पुढील काही महिन्यातच या दोन्ही प्रकल्पांना सुरुवात होईल.असे खासदार राजाभाऊ(पराग)प्रकाश वाजे
नाशिकलोकसभा यांनी सांगितले..
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





