best news portal development company in india

निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर येथील होळकर वाडा जतन संवर्धन व संरक्षण व्हावे यासाठी मुख्यमंत्री यांच्या शी बोलणार =मा.खासदार विकास महात्मे

SHARE:

 आज 20 जून 2025 रोजी मा.खासदार विकास महात्मे यांचा निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर येथील होळकर वाडा पाहणी दौरा.. होळकर वाडा जतन संवर्धन व संरक्षण व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार =विकास महात्मे…

 

नाशिक: निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर येथे होळकर वाडा पाडल्या संदर्भाच्या बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमातून संपूर्ण भारतभर प्रसार झाल्याने नेते,पुढारी या ठिकाणी पहाणी दौरे करत आहे मागील काही काळात संतोष महात्मे यांनी पाहणी दौरा केला तसेच आज 20 जून रोजी विकास महात्मे यांचा पाहणी दौरा आयोजित केला होता.

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नांदूर मध्यमेश्वर येथील होळकर वाड्याची विकास महात्मे यांनी पाहणी केली असता  वाड्याच्या भिंती पाडण्याचा प्रकारही घडलेला आहे ,या सर्वांमध्ये मोठी राजकीय ताकद असून या संदर्भात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक समितीचे संस्थापक अध्यक्ष समाधान बागल व समितीच्या मार्फत व ग्रामस्थांच्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली होती.

         संपूर्ण ग्रामस्थांच्या मते हे अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या वाड्यातील मंदिर गावासाठी कायमस्वरूपी खुले असावे व हे मंदिर गावासाठी असावे असे आवाहन करण्यात आले आहे, तर पद्मश्री माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी सदर मंदिर हे गावासाठी असावं त्याचप्रमाणे अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले वस्तूंची जपणूक व्हावी वाड्याच संवर्धन व्हावं व संवर्धनासोबतच मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व्हावं तसेच अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या ज्या वस्तू या ठिकाणी उभ्या केल्या त्या सर्व वस्तू या जपल्या जाव्यात तसेच अहिल्यादेवींचे पूर्णाकृती भव्य स्मारक व्हावे व परिसरात आहिल्यासृष्टीची निर्मिती व्हावी अशी स्पष्ट भूमिका विकास महात्मेंनी मांडली. अहिल्यादेवी होळकर यांचं काम हे अद्वितीय आहे .अहिल्यादेवींच्या कार्याची कुणी तुलना करू शकत नाही. मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्य हे जगविख्यात असून त्यांचा खाजगीचा वाडा हा अहिल्यादेवींच्या मंदिरापेक्षा कमी नाही आणि अशा वाड्याची जर तोडफोड होत असेल तर ही गोष्ट अक्षम्य आहे, आणि म्हणून या संदर्भात पर्यटन विभाग व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रत्यक्ष मार्ग काढण्यावर भर देणाऱ असल्याचे  विकास महात्मे यांनी सांगितलं नांदूर मध्यमेश्वर येथील अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली मंदिरे व वाडा यासाठी भरून निधीची तरतूद करण्यासंदर्भात ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्या संदर्भात त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे पर्यटन विभागामार्फत मंजूर असलेला निधी हा तसाच राहून आणखी निधी त्यासाठी मंजूर होण्या संदर्भात चर्चा करणार असल्याचे सांगितले तसेच बीजेपी चे प्रभारी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन्ही जागी या संदर्भात चर्चा करून योग्य तो मार्ग काढून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे माजी खासदार विकास महात्मे यांनी सांगितले.

या प्रसंगी मनमाड माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, समाधान बागल, शरद शिंदे, भाऊसाहेब भवर, मुकुंदराज होळकर,गोरख कांदळकर,सनी फसाठे नवनाथ सोनवणे,ईश्वर माळी,बंडू कुवर, दीपक सूडके, संतोष पोमणार भाऊसाहेब ओहोळ,तुषार चिंचोले, मोरे सर,, वाळूबा जाधव, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई