महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, महिला यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाला सिन्नर तालुक्यातून पाठिंबा….
प्रतिनिधी:-भाऊसाहेब हांडोरे, सिन्नर
प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार दिव्यांग संघटना प्रहार शेतकरी संघटना सिन्नर तालुका यांच्या वतीने दिनांक 14 जून रोजी सिन्नर येथे भव्य धरण् आंदोलन. करण्यात आले सिन्नर तालुक्यातील दिव्यांग बांधव शेतकरी प्रहार जनशक्ती पक्ष कार्यकर्ते सिन्नर बस स्थानक येथील क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सिन्नरशहरातून आपल्या दिव्यांगांच्या थ्री व्हीलर गाड्या व पायी रॅलीचे आयोजन करून सिन्नर शहरातून पेठेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून “बच्चु भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है”, “हमारी मांगे पुरी करो”, अशा घोषणा करून छत्रपतींना पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच पुढे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करून सिन्नर तहसील कार्यालय जवळ धरणे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी नाशिकचे लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे यांनी जाहीर पाठिंबा दिला तसेच शेतकरी बांधव शेतकरी नेते यांनीही पाठिंबा दिला दिव्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन सोडणार नाही असे निर्णय घेण्यात आले परंतु आदरणीय बच्चु भाऊ कडू यांच्या आदेशाप्रमाणे अमरावती येथे शासनाने दिव्यांगाच्या मागण्या मान्य झाल्या आहेत दिव्यागाना पेन्शन वाढ निर्णय 15 जून पर्यंत घेण्यात येईल तसेच शेतकऱ्यांचे कर्जमाफी संदर्भात समिती तयार करून आदरणीय बच्चु भाऊ यांना त्यामध्ये सहभागी करून घेऊ व इतर मागण्यासाठी संबंधित विभागांकडून मंजुरी घेऊन माननीय मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाची लवकरात मंजुरी घेण्यात येणार असल्याचे लेखीआश्वासन मिळाल्याने आजचे आंदोलन थांबवण्यात आले व आपल्या मागण्यांचे निवेदन माननीय तहसीलदार साहेब देशमुख साहेब व नायब तहसीलदार मुंदडासाहेब. व पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी शिंगार पोलीस स्टेशन यांनी आम्हास योग्य ते सहकार्य करून बंदोबस्त देण्यात आलायाप्रसंगी नाशिक होऊन आलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद भाऊ शिंदे, शहर उपाध्यक्ष अमजद पठाण, राज्य समन्वयक संध्याताई जाधव, ज्येष्ठ नेत्या वैशालीताई अनवट ,उपस्थित होत्या तसेच प्रहार दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ पाचोरे ,जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब सांगळे, जनशक्ती तालुकाध्यक्ष कैलास जी दातीर, एडवोकेट विलाजी खैरनार, कार्याध्यक्ष नंदू भाऊ शिरसाठ, सचिव भगवान पगार, युवा अध्यक्ष दत्ताभाऊ लोंढे,गणपत भाऊ नाठे उपाध्यक्ष, मुसळगाव अध्यक्ष नवनाथ कुऱ्हाडे, उपाध्यक्ष चंद्रभान काकड, गोंदेअध्यक्ष रामनाथ तांबे ,वाल्मीक तांबे, वावी अध्यक्ष केशव ताजणे, मुसळगाव माळेगाव अध्यक्ष रतन गायकवाड, चिंचोली अध्यक्ष ज्ञानेश्वर पागिरे ,सचिव मंगेश उगले, मारुती भाऊ लांडगे ,विशाल काकड ,योगेश कहांडाळ ,शहर उपाध्यक्ष आनद सातभाई,दिगंबर शिरसाट, पांडुरंग आगळे,सालके ,पंकज भाऊ पेटारे, योगेश बिडवे,गोरख काकड ,निलेश उगले रघु पावशे,विलास जायभावे,ज्ञानेश्वर काकड ज्ञानेश्वर भाऊ हासे,दिलीप काका देशमुख,प्रकाश भाटजीरे, महिला तालुकाध्यक्ष पुष्पाताई भोसले,
महिलाअध्यक्ष मालन ताई आव्हाड, महिला सचिव कविता ताई खेळणार, महिला उपाध्यक्ष सीमाताई वाकळे,
संगीता ताई आगळे, महिला शहराध्यक्ष संगीताताई लोखंडे, मनीषाताई पाचोरे,ताराबाई झोमाळ, व इतर मान्यवर मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......






