best news portal development company in india

नांदूर मधमेश्वर येथील होळकर वाडा संदर्भात मा.खासदार भास्कर भगरे सर, साहेब यांना निवेदन देण्यात आले

SHARE:

नांदूर मध्यमेश्वर येथील होळकर वाडा संदर्भात मा.खासदार भास्कर भगरे सर, साहेब यांना ग्रामपंचायत नांदूर, तसेच नासिक जिल्ह्यातील होळकर प्रेमी, धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

प्रतिनिधी नाशिक:-गेल्या काही दिवसा पूर्वी नांदूरमध्यमेश्वर येथील होळकर वाड्याचे जेसीबीने वाडा पाडून तेथे अतिक्रमण होत असल्याचे दिसून आले, म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रेमी यांनी हे अतिक्रमण होऊ नये पारंपरिक होळकर वाडा याचे संगोपन व्हावे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आठवणी नेहमी जागृत राहाव्या म्हणून खासदार श्री.भास्कर भगरे सर यांना अशा विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. 
   नांदूरमध्यमेश्वर होळकरवाडाच्या बाबतीत पुढील मागण्या करण्यात आल्या आहे. -ऐतिहासिक वास्तू पाडणाऱ्या व त्यासाठी मदत करणारे सर्व अधिकारी तत्काळ निलंबित करावे.– अहिल्यादेवी होळकर यांचा ऐतिहासिक वाडा आहे हे कळाल्यानंतरही काम सुरु ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठेकेदाराचा परवाना तत्काळ रद्द करावा.–चुकीच्या पद्धतीने व चुकीचे कागदी माहिती देऊन अहिल्यादेवी होळकर ट्रस्ट चे नाव कमी करणारऱ्या लोकांवर शासनाची फसवणुक करुन मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांचा स्वताचा वाडा हडपु पाहणाऱ्यावर कठोर कारवाई करावी.–शासनाची दिशाभूल करून शासकीय निधीच्या अडून ऐतिहासिक वास्तू पाडून त्या बळकवण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्या ट्रस्ट चे रजिस्ट्रेशन त्वरित रद्द करून संबंधित पदाधिकारी यांच्याकडून होळकर वाडा पाडल्याबद्दलची नुकसान भरपाई तत्काळ वसूल करण्यात यावी.–नांदुरमध्यमेश्वर राम मंदिरासाठी पर्यटन विभागाकडून मंजूर झालेल्या रकमेत वाढ करुन अहिल्यादेवी होळकर यांचा होळकर वाडा संवर्धन करून वाड्यातील मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात यावा. –नांदूरमध्यमेश्वर होळकर वाड्यामध्ये राम मंदिराचा जन्मोतदार झाल्यानंतर मातोश्रींचे स्मारक त्या ठिकाणी तयार करण्यात यावे.–कुठल्याही प्रकारचे सुशोभीकरण नवनिर्मिती करत असताना अहिल्यादेवी होळकर यांचा होळकर वाडा हा कुठल्याही प्रकारे पाडला जाणार नाहीत तुटला जाणार नाही तसेच त्यासंबंधीचे अधिकार कुठल्याही शासकीय खाजगी स्वयंसेवी किंवा लोकसहभागातून चालणाऱ्या कोणत्याही संस्थेस असता कामा नाही याची शास्वती शासनामार्फत द्यावी.–नांदूर होळकर वाडा राम मंदिर फेरफार बदल यासंदर्भात सीबीआय चौकशी करण्यात यावी.अश्या अनेक मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले .

  या वेळी प्रहार जिल्हा चिटणीस,समाधान बागल उपस्थित  होते,तसेच याप्रसंगी गोरख देवकर, शरद शिंदे,गोरख कांदळकर,गोरख गाडे ,अनिल शिंदे, प्रज्वल पानसरे, माणिक देवकर,दत्तू देवकर, तसेच होळकर प्रेमी समाज बांधव उपस्थित होते.
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई