कर्ज माफीचा विसर पडलेल्या शासनाला जाग येण्यासाठी ” प्रहार ” जनशक्ती संघटना आक्रमक… उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या गाडीवर उतारे फेकणार / .. !
प्रतिनिधी:-भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर सिन्नर : दि, 8 जुन – 2025 — शेतकऱ्यांना कर्ज माफिचे आमिष दाखवून विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळावले अन् निवडणूक संपताच या सरकारला सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारला याचा विसर पडला आहे. कारण प्रहार जनशक्ती पक्षाचे रक्तदान आंदोलन.मशाल आंदोलन केले आहे परंतु झोपेचं सोंग घेवून जाणुन बुजुन शेतकऱ्यांना वेठीस धरून त्यांच्यावर अन्याय होत आहे याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनांचे अध्यक्ष यांनी नुकतेच अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे, या अनुषंगाने सिन्नर तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास दातार यांनी एक आगळं वेगळं आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील बारा गाव पिंपरी सह अनेक गावांमध्ये शेतकर्यांचे उपसा जलसिंचन योजना व शेती साठी घेतलं कर्ज माफ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती.निवडणुकीनंरतर या घोषणेचा या नेत्यांना विसर पडला असुन शासनाने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या गाडीवर नाशिक व सिन्नर येथे कोणत्याही क्षणी कर्ज असलेल्या 7/12 उतारे फेकणार असल्याचे पत्रक काढून प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना निवेदन दिल्यानंतर ते निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात आले आहे असे तहसीलदार कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. या आंदोलनाची तयारी सुरू केली असून या पुढे कोणीही क्षणी या संबंधित नेत्यांना घेराव घालून 7/12 उतारे फेकणार असल्याचे पत्रक काढले आहेत या निवेदनावर तालुका अध्यक्ष कैलास दातार, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत डावरे, महिला अध्यक्ष पुष्पा भोसले, शहर अध्यक्ष संगिता आगळे, उपाध्यक्ष गोपाल जी गायकर, शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष पांडुरंग आगळे, शेतकरी तालुका संघटक प्रकाश थोरात, युवा अध्यक्ष दत्तात्रय लोंढे, कामगार अध्यक्ष योगेश काहंडळ, शहर कार्याध्यक्ष गणेश थोरात, संपर्क प्रमुख सुनील जगताप, दिव्यांग कार्याध्यक्ष भाऊसाहेब सांगळे, तक्रार अध्यक्ष गणेश म्हस्के, कार्याध्यक्ष विलास करणार, प्रभारी कांचन भालेराव, आशाताई गोसावी.आदी मान्यवरांनी सह्या केल्या आहेत.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





