अहिल्यादेवीच्या त्रिशताब्दी वर्षात नांदूर मध्यमेश्वर येथील प्रकार दुर्दैवी तीनशे वर्ष जुनी ऐतिहासिक वास्तू अशा रीतीने पाडून आपल्या महापुरुषांच्या पाऊलखुना पुसण्याचे काम.नांदूर मध्यमेश्वर येथील वाड्याला संतोष महात्मे यांचे पाहणी दौरा…
प्रतिनिधी:-भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर.
नाशिक:- नाशिक जिल्हातील निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर येथील होळकर वाडा चुकीच्या पद्धतीने पाडला गेला. तीनशे वर्ष जुनी ऐतिहासिक वास्तू अशा रीतीने पाडून आपल्या महापुरुषांच्या पाऊलखुना पुसण्याचे काम होत आहे, या विरोधात नाशिक जिल्ह्याचे सामाजिक कार्यकर्ते समाधान बागल यांनी अखंड महाराष्ट्रभर आवाज उठवला आणि महाराष्ट्रातून सर्वपक्षीय नेते या होळकर वाड्याला भेट देण्यासाठी येऊ लागले. या धरतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोषजी महात्मे (अमरावती )यांनी नांदूरमध्यमेश्वर होळकर वाड्याला आज भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी होळकर वाड्याची संपूर्ण पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांशी संपर्क केला.
या होळकर वाड्याच्या प्रकरणी योग्य ठिकाणी आवाज उठवणार असल्याचे ही त्यांनी जाहीर रित्या सांगितले आहे.पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा खाजगी वाडा ही नाशिक जिल्ह्याला होळकर शाही इतिहासाच्या व मराठा इतिहासाच्या दृष्टीने मिळालेली एक अद्वितीय देणगी आहे. या अशाप्रकारे वास्तूंची फोडतोड करून या ऐतिहासिक स्मारकांचे नुकसान करणं किंबहुना ते नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करणे हा गैरप्रकार अतिशय निंदनीय आहे. या प्रकाराची सखोल चौकशी होऊन यामध्ये दोषी असणारे सर्व अधिकारी कर्मचारी संस्था यांच्या सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शासन दरबारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या परिस्थितीत नांदूर मध्यमेश्वर चे सर्व ग्रामस्थ उपस्थित असताना संतोष महात्मे यांनी वाड्याची पाहणी केल्यानंतर अतिशय दुःखद भावना व्यक्त केल्या व राम मंदिराचे दर्शन घेऊन एवढ्या पवित्र वास्तूचे नुकसान झालं व शासन दरबारी या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया अद्याप पर्यंत दिली जात नाह,याविषयी खेद व्यक्त केला. आपल्या स्तरावरून योग्य ठिकाणी आवाज मोठा करून या प्रकरणाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन या वेळी संतोष महात्मे यां नी दिले .या प्रसंगी ग्रामस्थ व होळकर प्रेमी नाशिक जिल्हा या प्रसंगी उपस्थित होते.मा.संतोष महात्मे राष्ट्रवादी काँग्रेस अमरावती जिल्हा अध्यक्ष ,प्रवीण भुजदे ,समाधान बागल, शरद शिंदे, भाऊसाहेब भवर, गोरख कांदलकर, बंडू कुवर, नवनाथ वैद्य, वाळू जाधव, दिलीप बडे,निखिल सोनवणे, गणेश वाघ, विजय शिंदे, होळकर प्रेमी व नांदूरमध्यमेश्वर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......












