त्रिशाताब्दी जयंती निमित्त खासदार राजाभाऊ वाजे व अण्णासाहेब मोरे, मुकुंद राजे होळकर,साधू संत उपस्थितीत अहिल्या आरती,गोदा आरतीने झाली आनंद यात्रेची सांगता…
https://youtu.be/2HmaCw3LPoo?si=S8V9eV5TstOUox8G
नाशिक: राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समितीचे संस्थापक अध्यक्ष समाधान बागल यांनी अनोख्या स्वरूपाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी तीनशे मूर्तींचे वाटप केले एक गाव एक मूर्ती याप्रमाणे 300 मूर्ती वाटून 300 गावांमध्ये एकाच वेळी जयंती साजरी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तसेच 300 जागी जयंती साजरी होणार या आनंदात त्यांनी मागील तीन दिवसांमध्ये 28 मे 2025 रोजी इंदोरचे सध्याचे युवराज यशवंत राजे होळकर यांच्या हस्ते त्यांना साखर वाटप करून आनंद यात्रेची सुरुवात केली व मागील तीन दिवसात जेथे जयंती तेथे साखर वाटप आनंदाची साखर वाटून समाधान बागल यांनी आपली आनंदयात्रा साजरी केली आणि या भव्यदिव्य आनंद यात्रेमध्ये त्यांनी जिथे जिथे मूर्ती दिल्या व जिथे जिथे उत्तम स्वरूपात जयंती साजरी झाली त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन साखर वाटून आपला आनंद व्यक्त केला या आनंद यात्रेदरम्यान नाशिक ते चांदवड असा संपूर्ण भागामध्ये ज्या ज्या गावांमध्ये मूर्ती वाटल्या त्या गावांमध्ये त्यांनी प्रवास केला.
नाशिक गोदावरी अहिल्या घाट येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीच्या जन्मोत्सव सोहळा व्हिडीओ बघण्यासाठी लिंकवर क्लिक करा… https://www.facebook.com/share/v/156BsFakTe/
https://www.facebook.com/share/v/156BsFakTe/ https://youtu.be/2HmaCw3LPoo?si=S8V9eV5TstOUox8G
तसेच या आनंद यात्रेचे अवचित्य सांगितले व या आनंद यात्रेची सांगता करत असताना सालाबाद प्रमाणे याही वर्षी 31 मे रोजी संध्याकाळी रामकुंड नाशिक या ठिकाणी गोदाआरती व अहिल्या आरती विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत असते आणि याही वर्षी ह्या आनंद यात्रेची सांगता करताना प्रमुख अतिथी साधू संत, महात्मे, खासदार राजाभाऊ वाजे व श्री स्वामी समर्थ केंद्राचे माननीय श्री.अण्णासाहेब मोरे,होळकर करण्याची वंशज मुकुंद राजे होळकर, राजेंद्र बागुल, दिगंबर मोगरे, पुनम ताई मोगरे, शोभाताई काळे,संगीता ताई पाटील, दत्तू बोडके, श्याम गोसावी, बब्बू भगत,या जन्मोत्सवाचे अध्यक्ष,निवृत्ती धात्रक हेमंत शिंदे,शशिकांत कोथमीरे,भूषण जाधव,वैभव रोकडे,तसेच mहजारो होळकर प्रेमी मातेचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.हे प्रमुख अतिथी आनंद यात्रेच्या सांगतेवेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व त्यांचे हातून गोदाआरती व अहिल्यादेवी आरती संपन्न झाली त्याचप्रमाणे नाशिक मधील अनेक मान्यवरही यावेळी उपस्थित होते.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......










