प्रतिनिधी:-भाऊसाहेब हांडोरे सिन्नर,
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या कृषी खाते म्हणजे ओसाड गावची पाटीलकी विधानावर सर्वत्र
चर्चा
नाशिकः महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या मागणी विषयी बरळले की आता काय ढेकळांचा पंचनामा करायचा का असे बालिश शब्द वापरून शेतकऱ्यांचा अपमान केला. हे सर्व महाराष्ट्राने पहिले व ऐकले मागील विधान विसरत नाही,तोच परत छत्रपती संभाजी नगर मध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधताना माणिकराव कोकाटे पुन्हा बरळले की .”कृषी खाते म्हणजे ओसाड गावची पाटीलकी”यावरून माणिकराव कोकाटे यांना कृषी खात नकोसे झाल्याचं दिसून येत आहे. अशी सर्वत्र चर्चा होत आहे.
या विषयावर असे बोलले जाते की माणीकरावने कधी शेती केली का ? शेतीतील अडचणी आणि दू:ख बघितलय का ? तर उतर अजिबात नाही. मंत्रीपद मिळाले म्हणजे शेतकऱ्यांचा
वारंवार अपमान करण्यासाठी मंत्री झाला असाल तर शुध्दीवर या..अर्थात माणिकरावचे हातातच काही ठेवले नसल्यामुळे वैफल्यातून ही विधाने येतात.चांगल्या सुखसुविधांचे गावचा कारभार कुणीही करेल ओसाड गावचा विकास करणारा खरा बुध्दीमान… मंत्रीपदाची आस होती मग मिळालेले शेतकरी हिताचे खाते ,त्यात स्वताचा असलेला (?) राजकिय अनुभव वापरुन गुणवत्ता दाखविण्याचे सोडून या खात्याला ओसाड गाव हि संकल्पना दिली जात असेल तर हरित क्रांन्तीचे जनक स्व.वसंतराव नाईकाचा आदर्श का घेत नाही .?मा.शरद पवार देशाचे कृषी मंत्री राहीले त्यांचा अभ्यास करायचा…हे सोडून वेगळंच काहीतरी बालीश मत जर मांडले जात असेल तर समजावे काहीतरी लाभावाचून वंचित होत असावे …एवढाच मनात तिटकारा निर्माण झाला असेल तर संवंग लोकप्रियतेसाठी बाष्कळ बडबड करण्यापेक्षा राजीनामा द्यायला काय हरकत आहे…करा हिम्मत. बघू तेवढी पाटीलकी जमते का ?
अशोक महाराज घुमरे सांगवीकर ता. सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





