best news portal development company in india

  सिन्नर च्या शहा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ… हांडोरे वस्तीवर मेंढ्यांच्या कळपावर हल्ला, एका घोड्याच्या शिंगीचा मृत्यू… परिसरात पिंजरा बसवण्याची मागणी…..

SHARE:

प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर

      नाशिक जिह्यातील सिन्नर,तालुक्यातील शहा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ… हांडोरे वस्तीवर मेंढ्यांच्या कळपावर हल्ला, एका घोड्याच्या शिंगीचा मृत्यू… परिसरात पिंजरा बसवण्याची मागणी…..
     सिन्नर: सध्या सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी विज खंडित होत आहे.त्यामुळे  याच अंधाराचा फायदा घेऊन बिबट्याचा  बिनधास्त वावर वाढला आहे. याचा फटका मिरगाव येथील मेंढपाळ स्थलांतर शहा येथील पत्रकार भाऊसाहेब हांडोरे यांच्या वस्तीवर मुक्कामी होते. रात्री जेवण झाल्यावर झोपण्याच्या तयारीत असताना बिबट्या दिसला कुत्रा आणि संबंधित मेंढपाळ यांनी त्याला हुसकावून लावले होते.परतु काही वेळाने बिबट्या पुन्हा मेंढ्यांच्या कळपावर आला व माणसांची हालचाल दिसत नाही, याचा अंदाज घेऊन बिबट्याने थेट आठ दिवसांपूर्वी जन्म झालेला घोड्याच्या शिंगीवर हल्ला चढवला व काही क्षणातच या पिल्लाचा जिव घेतला. असे लक्षात येताच बिबट्याचा तावडीतून या शिंगीला सोडविण्यात आले. परंतु त्याचा तो पर्यंत मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले..

    सिन्नर तालुक्यातील सर्व भागात बिबट्याचा वावर वाढला आहे..वाडी वस्त्यांवर रात्री अपरात्री बिबट्याचा कायमच वावर असतो.. जनावरांची व माणसांची शिकारीच्या शोधात असलेल्या या बिबट्याच्या धास्तीने तालुक्यातील पुर्व भागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे वनविभागाने तत्परतेने कारवाई करून परीसरात पिंजरा बसवण्याची मागणी जोर धरू लागली आहे त्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी त्वरित दखल घेऊन कारवाई केली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.. त्वरित उपाययोजना न केल्यास संबंधित अधिकारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर खटला दाखल करून या विभागाला दोषी ठरवले का जाऊ नये असे मत व्यक्त केले आहे…

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई