
प्रतिनिधी:-भाऊसाहेब हंडोरे,सिन्नर
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरातील बहुचर्चित असलेल्या बसस्थानकाचा काल पुढील सहा टर्मिनल चा भाग भर पावसामध्ये कोसळला त्याखाली शिवशाही बस व काही फोर व्हीलर दाबल्या गेल्या तसेच चार जण जखमी झाले. जखमींची प्रकृती स्थिर आहे,परंतु बस स्थानकाचा भाग कोसळला यावरून केलेल्या बांधकामाचा दर्जा हा निकृष्ट आहे,असे लक्षात आले यामागे कोण भ्रष्टाचार करणारे अधिकारी किंवा स्थानिक राजकीय पुढारी आहे सकाळी 11 वाजता काळा पिते लावून आंदोलनाला सुरुवात,,संघर्ष समितीचे अध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू… याबाबत ठेकेदारांची चौकशी व्हावी..
याबाबत संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी म्हणून,
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब,नाशिक कलेक्टर साहेब,सिन्नर तहसील साहेब, सिन्नर पोलीस स्टेशन्, यांना विनंती अर्ज केलेले असून आंदोलन सुरू..
यावेळी बसस्थानक कामातील भ्रष्टाचार चौकशी झालीच पाहिजे….भ्रष्टाचार करणारया मंत्री माणिकराव कोकाटेवर कारवाई झालीच पाहिजे….भ्रष्टाचार करणारया अधिकारयांवर कारवाई झालीच पाहिजे….भ्रष्टाचार करणारया ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे.अशा घोषणाबाजी करत मागणी करण्यात आली. संघर्ष समिती सिन्नर विनंती अर्ज दि.२६/५/२०२५
आपणास आंदोलक शरद शिंदे पाटील व सिन्नर संघर्ष समिती विनंतीपुर्वक कळवितो की सिन्नर येथील बसस्थानक अलिशान इमारत कामात प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहेत. अगदी निक्रुष्ट दर्जाचे काम झालेले आहेत. आम्ही मागेही मागणी केलेली.आहेत. आज पावसात सदर आलिशान कमकुवत इमारत कोसळली.सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. परंतु दररोज सदर ठिकाणी हजारो प्रवासी बसने प्रवास करण्यासाठी वर्दळ असते.यामध्ये वयोवृद्ध महिला पुरुष,विदयार्थी विदयार्थीनी,महिला, पुरुष ये जा करतात.तसेच बसस्थानकात असलेल्या होटल, केंटीन,पेपर स्टॉल,सायबर कजफे,क्लास व बेंकेत येत असतात.परंतु आज हे बसस्थानक कोसळले.जर तेथील प्रवासी सावध होत बाजुला पळाले नसते तर शेकडो जणांचे जीव गेले असते,शेकडो जखमी झाले असते.परंतु सिन्नर तालुक्यातील जनतेच दैव बलवतर म्हणून जिवितहानी पासून परमेश्वराने वाचवले.
सदर बसस्थानक तत्कालीन आमदार माणिकराव कोकाटेंनी बिओटी तत्वावर बांधले असुन. फार उत्क्रुष्ट बांधकाम म्हणून महाराष्ट्रात स्वताच स्वताची पाठ थोपटत फुशारकी मतदान घेऊन५वेळा आमदारकी भोगली .मतदान घेत वारंवार आमदार झाले.
परंतु सदर काम अत्यंत निक्रुष्ट दर्जाच काम झालेले आहेत. कामांत प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहेत. सदर निक्रुष्ट कामाची व भ्रष्टाचार याची चौकशी व्हावी.आणि दोषी लोकप्रतिनिधी माणिकराव कोकाटे,ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कडक कारवाई व्हावी.या मागणीसाठी सोमवार दिनांक २६मे रोजी सकाळी ११वाजता ते १२ दरम्यान ठिकाण बसस्थानक येथे काळया फिती लाऊन धरणे आंदोलन करत कारवाईची मागणी करत आहेत.सदर भ्रष्टाचार चौकशी मागणी मंत्रालय पर्यंत जावी व तातडीने कारवाई व्हावी यासाठी चार दिवस अभिनव पद्धतीने शांतपणे व कायदा सुव्यवस्था पाळत लोकशाही पद्धतीने करण्यात येणार आहेत.पाऊस व विजा यामुळे आमरण उपोषण न करता शोर्ट पिरियड आंदोलन करण्यात येणार आहेत.सदर आंदोलन ११ते १२दरम्यान करण्यात येणार आहेत. तपशील
१)सोमवार दि.२६/५/२०२५रोजी काळ्या फिती लावत धरणे आंदोलने करण्यात येणार आहे तसेच
२)मंगळवार दि.२७/५/२०२५ भिक मागो आंदोलन करण्यात येणार आहे तसेच
३)बुधवार दि.२८/५/२०२५ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार आहे तसेच
४)गुरुवार दि.२९/५/२०२५तिरडी आंदोलन करण्यात येणार आहे तसेच
५)शुक्रवार दि.३०/५/२०२५मुंढण आंदोलन करण्यात येणार आहे
वरील प्रमाणे कायदा सुव्यवस्था पाळत लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहेत. क्रुपया सदर कामाची तातडीने चौकशी करावी आणि तत्कालीन आमदार माणिकराव कोकाटे,संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर.कडक कारवाई व्हावी व आंदोलनाला परवानगी देण्यात यावी हि विनंती. असे अर्ज देण्यात आले…
शरद तुकाराम शिंदे पाटील
संघर्ष समिती सिन्नर
मो.९६८९३५०६२२
शिवाजी गुंजाळ
संजय कुराडे
चिंधु गुंजाळ
कैलास हिरे
ज्ञानेश्वर हिरे
बापू सानप
क्रुष्णा लहाणे
लक्ष्मण मोरे
किरण पाटील
अंकुश घुगे
दिनकर शिंदे
गोपाळ आव्हाड
डि.एम.कुंदे
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......










