best news portal development company in india

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरामध्ये महाराष्ट्रात बहुचर्चित असलेले बस स्थानक दुपारच्या पावसाने कोसळले

SHARE:

प्रतिनिधी:-भाऊसाहेब हंडोरे,सिन्नर

  नाशिकः जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरू असल्याचे दिसत आहे परंतु नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरांमध्ये काल ढगफुटी सदृश्य पावसाने जोर मारला व यामध्ये शहरांमध्ये पाणीच पाणी झाले होते तसेच नद्यांनाही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते सिन्नर शहरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान झालेले आहे.

25/5/2025 रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरातील महाराष्ट्रात बहुचर्चित असलेले बस स्थानक दुपारच्या झालेल्या अवकाळी पावसामुळे सहा टर्मिनल वरील स्लॅब कोसाळला. या स्लॅब खाली महामंडळाची शिवशाही बस व काही चार चाकी वाहने दाबली आहे. शिवशाही बस मधील नागरिकांना आपत्कालीन मार्गातून बाहेर काढण्यात आले आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. परंतु चार चाकी वाहनाची 100% नुकसान झालेले आहे या घटनेमध्ये चार जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले त्यांना रुग्णालयात दाखल केले त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.सदर घटनेनंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. तसेच, सिन्नर शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. घटनास्थळी स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा उपस्थित असून, पुढील धोका टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

“सिन्नर करांचा विकास खाऊन खाऊन झाला भकास आता तरी जनतेने सावध होण्याची वेळ आली आहे” अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.तसेच हे काम 2016 साली केलेल्या बस स्थानकाचे काम हे किती निकृष्ट दर्जाचे आहे हे यावरून लक्षात आले असून यावर स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत होते. 

 

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई