best news portal development company in india

महाराष्ट्र सह नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत गारपिट व अवकाळी पावसाचा कहर..

SHARE:

प्रतिनिधी:-भाऊसाहेब हांडोरे, सिन्नर.

जवळपास 31 में पर्यंत हा पाऊस सुरू राहणार असल्याचे व 7 जूनपासून मान्सूनच्या आगमनाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी यांनी सावधगिरी बाळगावी व पेरणी पुर्व मशागत करून ठेवावी असा सल्ला सर्वच हवामान तज्ञ देत आहे… 

     सिन्नर: महाराष्ट्र सह नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत गारपिट व अवकाळी पावसाचा कहर..

   नाशिक सिन्नर तालुक्यातील नायगाव परिसरात चक्क गारांचा पाऊस व जोरदार ढगफुटी झाली असून शेतकऱ्यांना मोठा फटाका बसला आहे,नाशिक शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला तर बऱ्याच ठिकाणी झाडेेही कोसळली रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्यामुळे रस्त्यांवर नाशिक शहरात सगळीकडे वाहनांची मोठी रीघ लागली होती.

तसेच नासिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पिंपळगाव, निफाड सिन्नर या ठिकाणी पावसाचा जोर अधिकच होता.अनेक ठिकाणी कांदा चाळ व जनावरांच्या गोठा यांचेही नुकसान झाले आहे.. सतत सुरू असलेल्या पावसाने थैमान घातले आहे,अजून काही दिवस अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना व शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे… तब्बल सतरा दिवसांपासून सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतीचे मशागतीची कामे खोळंबली आहेत तर अनेक ठिकाणी कांदा काडुन शेतात तसाच पडून आहे. पावसामुळे कांदा उत्पादक व द्राक्ष बागायतदार शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.. त्याला आधार देण्यासाठी शासकीय पातळीवर त्वरित उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे…
सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सून पुर्व पावसाने हजेरी लावल्याने सर्वसामान्य चाकरमान्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी लग्न समारंभ पार पाडतांना मोठी परवडत होत आहे. तर दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांना मोठा परिणाम झाला आहे सतत सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील सर्वत्र जोरदार हजेरी लावली आहे.
        जवळपास 31 में पर्यंत हा पाऊस सुरू राहणार असल्याचे व 7 में पासून मान्सूनच्या आगमनाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी यांनी सावधगिरी बाळगावी व पेरणी पुर्व मशागत करून ठेवावी असा सल्ला सर्वच हवामान तज्ञ देत आहे…

                      प्रतिनिधी
.          भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर


 

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई