
प्रतिनिधी नाशिक :- तालुक्यातील कसारा या ठिकाणी मुंबईहून नाशिक महामार्गावर येताना वाटेत कसारा घाट लागतो. या घाटाचे मूळ नाव ‘थळ घाट’, असे आहे. घाट जेथे संपतो, तेथेच उजव्या हाताला व घाटनदेवी मंदिरापासून १४ किलोमीटर अंतरावर गोल घुमटाकार ऐतिहासिक वास्तू दिसून येते. ही ऐतिहासिक वास्तू घाटाच्या उंच टेकडावर आहे. विशेष म्हणजेपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दूरदृष्टी इतकी होती की डोंगराच्या मध्य सेंटर मधून जो पाण्याचा झरा दरीच्या दिशेने वाहतो याच धारेच्या मध्यवर्ती ही बाराव निर्मिती केली आहे.साधारण उलट्या आकाराची किंवा घुमट समान दिसणारी ही प्राचीन वास्तू कुणाचेही लक्ष वेधते. बारव मुख्य रस्त्यातून ५० फूट अंतरावरच आहे. पूर्वीच्या काळात वाटसरुंना, यात्रेकरुंना घाटामध्ये विसावा मिळावा व पिण्याच्या पाण्याची (Drinking water) सोय व्हावी, म्हणून तसेच आजूबाजूला राहणारी खेडी यांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याची सुविधा व्हावी. म्हणून ही बारव बांधली आहे. 
जवळपास २५० वर्षांपूर्वी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याहोळकर यांनी ही बारव बांधली आहे. उन्हाळ्यात उंचावर असलेल्या बारवमध्ये भरपूर पाणी आहे. ४० फूट व्यासाची बारव पूर्ण दगडाने सुबक पद्धतीने बांधली आहे. झाड-पाला, जंगली प्राणी पडून पाणी दूषित होऊ नये, तसेच उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये, म्हणून त्यावर तीन बाजूंनी तीन अर्धगोलाकार आकाराच्या खिडक्या सोडत गोल घुमटआकाराच्या खिडक्या सोडत गोल घुमट बनविले आहेत. दगडी शिळा एकमेकांवर ठेवत राजवाडे किंवा महालाच्या घुमटासमान हे छत बनवताना बारवच्या सौंदर्यात अजूनच भर टाकत तिची स्वच्छताही ठेवण्याचे काम केलेले दिसते. बारवेत वर्षभर पिण्यायोग्य पाणी टिकून असते.
घाटातील दोन वाड्यांतील महिला आजही वर्षभर याच बारवमधील पाणी वापरतात. बारव किती खोल आहे, याचा अंदाज त्यात असलेल्या पाण्यामुळे येत नाही. मात्र, आजही बारव स्वच्छ व सुंदर असून, तिच्यात थोडीही पडझोड झालेली नाही. बारववर कुठेही शीलालेख किंवा नक्षीकाम नाही. या बारवचे निर्माण लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केल्यामुळे ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवींची बारव’ या नावाने ओळखतात.
अहिल्याबाई होळकरांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशांमधील अनेक तीर्थक्षेत्रांवर नदीकाठी प्रशस्त दगडी घाट, देखणी मंदिरे व यात्रेकरूंच्या सोयीसाठी पाणपोई व धर्मशाळा बांधल्या. नासिक मध्ये पंचवटी येथे अहिल्या रामघाट अहिल्या राम मंदिर काशी विश्वेश्वर मंदिर,धर्मशाळा,चांदवड येथे होळकर वाडा रंग महाल, रेणुका देवी मंदिर, त्र्यंबकेश्वर कुशावर्त त्र्यंबकेश्वर मंदिर गंगापूर येथे धर्मशाळाघाट,नासिक मध्ये अनेक मंदिरे बांधून, ओझर,पिंपळगाव बसवंत,निफाड लासलगाव लष्करी तळ, नांदूर मधमेश्वर दक्षिणकाशी चा उल्लेख पाच स्वरांचे मंदिरे मधमेश्वर मंदिर, मालेगावहोळकर पूल, त्र्यंबकेश्वर जाताना वाटसरुंसाठी 8 बारवांची निर्मिती या ठिकाणी बारवांची निर्मिती केलीजनतेच्या सोयीसाठी त्यांनी बांधकामे केली आहेत.कसारा घाटातील ही बारव पाहून मनोमन अहिल्यादेवी चा या कार्याचा गौरव वाटतो.
जय हिंद ????????⚔️???? जय अहिल्या
संकलित …..
श्री समाधान बागल (समाजसेवक )
(होळकर शाही अभ्यासक)
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......






