प्रतिनिधी:-भाऊसाहेब हंडोरे,सिन्नर
नाशिक जिल्ह्यातील सरपंच पदासाठी आरक्षण सोडत लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 810 ग्रामपंचायतीच्या अनुसूचित क्षेत्रातील 577 अशा एकूण 13087 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यात सिन्नर तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींचा समावेश आहे यामुळे आपल्या गावचा कारभारी कोण होईल हे मात्र नक्की सांगता येणार नाही, त्यासाठी अरक्षणा सोबतीची उत्सुकता निर्माण झाली आहे . यात प्रामुख्याने ज्या ग्रामपंचायतीच्या मुदतीत पूर्ण झाल्यानंतर नवीन येणाऱ्या सरपंचांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे परंतु ग्रामपंचायत आरक्षण जाहीर झाल्यावर सध्या सरपंच म्हणून कार्यरत असलेले विद्यमान सरपंच हे आपला पत्ता कट झाला आहे ,त्यामुळे सर्वसामान्य समाजाशी निगडीत कामं होण्याच्या दृष्टीने हलगर्जीपणा करून गावपातळीवर सामाजिक हितसंबंध जाणिवपूर्वक टाळुन नागरीकांना वेठीस धरले जाते कारण आपण यापुढे आता सरपंच होणार नाही या भावनेने काही सरपंच नागरीकांना वागणूक दिली जाते व कामं होण्याच्या दृष्टीने अडचणी येतात असा काही सरपंचाच्या वागणूकीवरुन लक्षात आले आहे..
सिन्नर तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षण सोडत दि, 21 व 24 जाहीर होणार आहे त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे समजले जाणाऱ्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी आरक्षण दि, 5 मार्च 2025 ते 4 मार्च 2030 या कालावधीत मुदत संपणा- या सिन्नर तालुक्यातील जवळपास 114 ग्रामपंचायत साठी सुधारीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती नागरिकांचा मागासवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गासाठी ग्रामपंचायत निहाय सरपंच आरक्षण निश्चित करणे व निश्चित करण्यात आलेल्या सरपंच आरक्षणातून महिलांसाठी ( अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती नागरिकांचा मागासवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गासाठी महिला सह ) राखून ठेवण्याची कार्यवाही करण्यासाठी पुरुषांकरीता दिनांक 21 / 4/ 2024 रोजी दुपारी बारा वाजता तहसील कार्यालय सिन्नर येथे आयोजित करण्यात आली आहे तर महिला आरक्षण ( सर्व ग्रामपंचायती ) यांच्याकरिता दिनांक 24 / 4 / 2025 रोजी दुपारी बारा वाजता करण्यात येणार असल्याचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी अधिसूचना काढली आहे. या वेळी निफाड चे प्रांताधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी अनुसूचित क्षेत्रातील व बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायत सदस्य / नागरिक / स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेले सदस्य / पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्यासाठी अहवान करण्यात येत आहे…
प्रतिनिधी:-भाऊसाहेब हंडोरे,सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......







