नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पाचोरे खु. येथील खंडेराव व तुकाराम बाबा यात्रोत्सव, विविध सामाजिक उपक्रमासह संपन्न झाला आहे.
निफाड:-निफाड तालुक्यातील पाचोरे खुर्द येथील तुकाराम बाबा व खंडेराव यात्रोत्सव विविध सामाजिक उपक्रमांसह ६ ते १२ एप्रिल दरम्यान ७ दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून शेवटच्या दिवशी ज्ञानेश्वर सांगळे यांच्या हस्ते बारा गाड्या ओढून यात्रोत्सव संपन्न झाला.
निफाड तालुक्यातील पाचोरे खुर्द येथील सालाबादाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात खंडेराव महाराज यात्रा संपन्न झाली, मात्र यावर्षी यात्रा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. सदर यात्रोत्सवात ड्रायव्हिंग लायसन कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते, तसेच गाय वाचवा, गायरान वाचवा या मोहिमेलाही सुरुवात करण्यात आली असून, पुढील काळात सदर मोहीम वर्षभर राबविणार असल्याचे यात्रोत्सव कमिटीने सांगितले. सदर यात्रा उत्सवात सात दिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या असून, यात्रोस्तवातील सामाजिक उपक्रमांचे पंचक्रोशीत यात्रा कमीटीचे कौतुक होत आहे. सदर यात्रा यशस्वी करण्यासाठी गावातील तरुणांनी उत्साहाने भाग घेतला.
पाचोरे खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त शालेय मुलांना वही ,कंपास, पुस्तक वाटप.भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानोपासक होते “ज्ञान ही शक्ती” आहे. यावर त्यांचा विश्वास होता यासाठी त्यांनी समाजाला सांगीतलं शिक्षण वाघिणीच दुध आहे जो पिणार तो गुरगुरनार बाबासाहेब बोलले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा… वाचाल तर वाचाल…असा संदेश दिला. तरी आजची तरुण पिढी ही बाबासाहेबांच्या कार्याबद्दल अनभिद्य दिसून येते म्हणून तरुण वर्गाला या थोर समासुधारकांचे समाजासाठी केलेले त्यांचं कार्य समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते या जयंती निमित्त आज या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वही कंपास पेन वाटप पुस्तकांचा वाटप करीत आहोत, असे पत्रकार ज्ञानेश्वर यशवंत सांगळे यांनी व्यक्त केले.
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान देऊन समतेची दिशा दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हते ते संबंध देशाचे नेते होते, ते युगकर्ते होते त्यांनी निर्माण केलेले युग हे सामान्य माणसाला लोकशाहीच्या क्षितिजावर उभे करणारे युग होते. असे प्रतिपादन हरीष जाधव विकास ऊगलमुगले महेश घुसले यांनी केले.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





