प्रतिनिधी:-भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
सिन्नर:शेतकऱ्यांच्या कर्जमाफी च्या अनुषंगाने राज्यातील या लबाड सरकारला जाग येण्यासाठी व शेतकऱ्यांची जाणीव लक्षात आणून देण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने बच्चुभाऊ कडू यांनी मशाल आंदोलन हाती घेतले असून राज्याचे कृषिमंत्री खुद्द माणिकराव कोकाटे यांच्याच घरासमोर निळा दुपट्टा व भगवा झेंडा घेऊन एका हातात मशाल पेटवून कोकाटे यांच्या नाशिक येथील निवासस्थानासमोर क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त साधून मशाल आंदोलन करणार असल्याची माहिती प्रहार संघटनेचे वतीने देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री यांच्या घरासमोर प्रहार चे कार्यकर्ते मशाल पेटवून आंदोलन करणार आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा सदस्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले .तर या आंदोलनासाठी संघटनेचे जिल्हाप्रमुख शेतकऱ्यांचे कैवारी गणेश निंबाळकर यांनी या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे जिल्ह्यातून हजारो शेतकरी आपापल्या विधानसभा सदस्यांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहे. शेतकऱ्यांचे कैवारी माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या उपस्थितीत व तसेच जिल्हाप्रमुख कृषी मंत्री यांच्या घरासमोर हातात मशाल व शेतकर्याना सोबत घेऊन आंदोलन करतील या आंदोलनात खुद्द बच्चू कडू सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचा गाजर दाखवून दिशाभूल करून. फसवून केली व मत मागितले व प्रचंड बहुमताने शेतकरयांनी विश्वास दाखवून या सरकारला सत्तेवर आणले. सत्तेवर येताच या लबाड शासनाला शेतकऱ्यांचा विसर पडला. कर्जमाफी तर नाहीच उलट . सुलट शेतकऱ्या बद्दल अपशब्द वापरून नेहमीच शेतकऱ्यांची खिल्ली उडवणारी सिन्नरचे आमदार राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर पैटती मशाल घेऊन असंख्य शेतकऱ्यांच्या साक्षीने आंदोलन करणारा असल्याची माहिती आहे. कारण आम्ही सत्तेत आलो तर तुमचा सातबारा कोरा करू म्हणजेच तुम्हाला कर्जमाफी करू असं ठोस आश्वासन देण्यात आलं परंतु शंभर दिवस होऊनही सरकारने अद्याप शेतकऱ्यांचा कुठलाही सातबारा कोरा झालेला नाही. या मागणीला धरून माननीय शेतकऱ्यांचे नेतृत्व ओम प्रकाश बच्चू कडू हे 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी सायंकाळी रात्री बारा वाजता महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभेचे आमदारांच्या घरासमोर मशाल आंदोलन पेटवून तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे व याचाच भाग म्हणून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिक येथील निवासस्थानी स्वतः बच्चू कडू यांच्या उपस्थितीत तमाम शेतकऱ्यांच्या साक्षीने मशाल आंदोलन करण्याचा व या माध्यमातून सरकारला जागं करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे.
प्रतिनिधी:-भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......






