best news portal development company in india

कोळपेवाडी सहकारी साखर कारखाना दिव्यांग ग्रामपंचायत सदस्याचा उपोषणाचा तिसरा दिवस प्रशासनाचे दुर्लक्ष

SHARE:

 

आजचा तिसरा दिवस कोळपेवाडी येथील कर्मवीर सहकारी कारखान्याकडून अद्याप दखल नाही.ग्रामपंचायत अपंग सदस्य यांचे उपोषण सुरूच … 

प्रतिनिधी:-भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
 सिन्नर , दि. 9 एप्रिल — तालुक्यातील भरतपुर येथील ग्रामपंचायत दिव्यांग सदस्य पंकज पठारे यांनी गेल्या चार दिवसापासून कर्मवीर सहकारी साखर कारखान्याच्या   डिसलरी गेट समोर उपोषण सुरू केले आहे. आजचा त्यांचा उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांचे प्रकृती घालवली असल्याची कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टरांनी तपासणी केले असता सांगितले. परंतु कोळपेवाडी सहकारी कारखान्यातील संबंधित अधिकारी यांनी अद्याप उपोषण स्थळी येऊन साधी सहानुभूती सुद्धा दाखवली नाही. अद्याप भेट दिली नसून कोणतीही कार्यवाही केली नाही व दखल सुद्धा घेतली नाही त्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे या संदर्भात कारखान्याचे एमडी आभाळे साहेब यांच्याशी संपर्क साधला असता ” मी बाहेर आहे .मला यायला उशीर लावू शकतो .मी कधी येईल हे नक्की सांगता येणार नाही. उपोषणा संदर्भात तेथील प्रशासकीय अधिकारी दखल घेतील असे बोलून आपली बाजू झटकून मोकळी झाले व प्रत्यक्ष भेट घेण्याचे टाळले.कारखान्याच्या मुळीयुक्त पाण्याने परिसरातील सिन्नर तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील जवळपास दहा-बारा गावांचा समावेश आहे यामुळे युक्त पाण्यामुळे परिसरातील जमीन नाभिक होण्याची भीती होती तसेच यामुळे युक्त पाणी जमिनीत येऊन ते मुळीयुक्त पाणी विहिरीला येऊ लागल्याने जनावरांची व माणसांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली व आरोग्यास धोकादायक ठरू लागले त्यावेळी लोकमत या दैनिकात भाऊसाहेब हांडोरे व अन्य पत्रकार यांनी आवाज उठवला व कारखान्याला आपली चूक कबूल करून त्यावर वरील तोडगा काढला गेला परंतु या च योजनेत हलगर्जीपणा दिसत आहे. तरी यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
 या अनुषंगाने त्यावेळेस कारखाने मार्फत प्रत्येक कुटुंबाला पाण्याचा टॅंक दिला व तो टॅंक कारखान्याच्या टँकर मार्फत पाण्याने भरून दिला जाईल अशी हमी दिली होती .म्हणून त्यापध्तिप्रमाणे अंमलबजावणी केली जात होती. परंतु ते पाणी आठ दिवसांनी येत असल्याने तोपर्यंत पाणी स्वच्छ करता येत नाही ते पाणी तसंच जपून वापरावे लागत असल्याने पाण्यात जीव जंतू तयार होतात व ती पाणी पिण्यालायक राहत नाही आरोग्य धोक्या निर्माण होतो. जानेवारी सुद्धा पीत नाही .या संदर्भात ग्रामपंचायतीने खरी परिस्थिती पाहून .पाण्याचा नमुना घेऊन. प्रत्यक्षात येऊन पंचनामा करावा.व आहे त्या स्थितीचा ठराव देण्यात यावा या मागणीसाठी गेल्या सहा महिन्यापासून प्रयत्न करत आहे व मागणी करत आहे परंतु ग्रामपंचायत सरपंच . उपसरपंच हे हा ठराव देण्यास नाकार देत असून व जबाबदारी झटकून मोकळे होत आहे या संदर्भात सरपंचांना विचारले असता आमचे कारखान्याशी आर्थिक संबंध असल्याने व आमच्या वाहने कारखान्याकडे असल्याने आम्हाला कारखान्याचे विरुद्ध ठराव देता येत नाही. भले तुम्ही आम्ही सरपंच आहे तोपर्यंत मागू नका आम्ही सरपंच खाली झाल्यानंतर नवीन येणाऱ्या सरपंचा ठराव घेऊ शकतात अशी असे सांगून श्री, पेटारे यांना ठराव देण्याचे नाकारले जात आहे तसेच याला जबाबदार ग्रामसेवक सुद्धा असल्याची श्री , पेटारे यांनी सांगितले ग्रामसेवक कुठलीही काम करण्यास टाळाटाळ करतो. उडवा उडवी ची उत्तरे देतो. ग्रामपंचायत दिव्यांग सदस्यांना अपमानित केल्यासारखे अपशब्द वापरून खिल्ली उडवत असतो. अशा ग्रामसेवकांची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी.तसेच भरतपुर ग्रामपंचायतीचे 
 सरपंच .ग्रामसेवक.व सदस्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे व ठराव नाकारल्यामुळे मला शेवटी अखेर कारखान्याच्या गेट समोर उपोषण करण्याची वेळ आली.तरी त्यामुळे मला न्याय देण्यात यावा व संबंधितांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी उपोषण प्रसंगी श्री पंकज पेटारे यांनी केली आहे. 
  .                  पत्रकार-भाऊसाहेब हांडोरे
                  ऐ वन न्यूज महाराष्ट्र, सिन्नर.
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई