नाशिक शहरात उबेर कंपनीकडून रिक्षाचालकांची होणारी लूट तसेच रिक्षा स्क्रॅपिंग मुदत वाढीसाठी आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदन….
प्रतिनिधी नाशिक:- नाशिक शहरातील रिक्षा चालकांची ऑनलाइन कंपनी उबेर काम करत असते,परंतु या कंपनीकडून रिक्षा चालकांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे,अशी माहिती रिक्षा चालक मालक यांनी निर्भय महाराष्ट्र पार्टी वाहतूक संघटना अध्यक्ष योगेश जी कायस्थ यांना दिली व अध्यक्ष योगेश कायस्थ यांनी त्वरित संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली व उबेर कंपनीचे विरोधात निवेदन दिले….
निर्भय महाराष्ट्र पार्टी वाहतूक संघटना…..
याबाबत माहिती अशी की, नाशिक शहरातील ऑनलाईन बुकिंग देणारी उबेर या कंपनीने मीटर पद्धतीने रिक्षा चालकांना पैसे देऊन बुकिंग देत असते, परंतु रिक्षा मीटर भाव हा 27 रू. या दराने ठरलेला असताना तसे अग्रीमेंटही रिक्षा चालकांसोबत कंपनीचे झालेले आहे,परंतु काही दिवसापासून बुकिंग घेतल्यानंतर पॅसेंजर ला ठराविक ठिकाणी सोडल्यानंतर झालेल्या मीटर भाडे (100 रुपये झाले असल्यास 50 रुपये देणे)अर्धे देऊन पॅसेंजर निघून जाते आहे, म्हणजेच 12 ते 13 रुपये प्रमाणे रिक्षाचालकांना दर मिळत आहे, यात पेट्रोल खर्चही मिळत नाही, म्हणून रिक्षा चालकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे, अगोदरच रिक्षा चालकांचा व्यवसाय हा खूप मंदीत चाललेला आहे, या स्पर्धेच्या युगात कुटुंब सांभाळणे ही अवघड झालेले आहे, अशातच उबेर ऑनलाइन कंपनीने रिक्षाचालकांची मोठी लूट करत असल्याचे लक्षात आले, या अनुषंगाने निर्भय महाराष्ट्र पार्टी वाहतूक संघटना आक्रमक झाली असून संबंधित परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना व रिक्षा चालकांना घेऊन निर्भय महाराष्ट्र पार्टी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून उबेर कंपनीचे विरोधात निवेदन दिले..
तसेच सोलापूर जिल्हा अधिकारी यांच्या जीआर नुसार स्क्रॅप रिक्षांना मुदत वाढून मिळावी, एलपीजी रिक्षांना 15 वर्ष होती तर 20 व्हावी व सीएनजी रिक्षांना वीस वर्ष होती तर पंचवीस व्हावी कारण नवीन रिक्षा घेणे म्हणजे तीन ते चार लाख रुपये खर्च होत आहे आणि एवढा मोठा खर्च या स्पर्धेच्या युगात रिक्षा चालकांना डोईजड होत आहे,म्हणून रिक्षांना मुदत वाढ करण्यात यावी. त्यातच रिक्षा व्यवसाय हा दिवसेंदिवस स्पर्धेमुळे रिक्षा पासूनचे उत्पन्न कमी होत आहे, म्हणून अधिकाऱ्यांच्या जीआर नुसार रिक्षा मुदतवाढ करण्यात यावी,याबाबतही नाशिक परिवहन विभागातील अधिकारी यांना निर्भय महाराष्ट्र पार्टी वाहतूक संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे.
सर्वसामान्य जनतेसाठी नेहमी निस्वार्थ,निडर,निर्भय असे काम करणारे निर्भय महाराष्ट्र पार्टी वाहतूक संघटना सर्व वाहनधारकांसाठी शासकीय दरात लायसन्स व वाहनांच्या सर्व कागदपत्रांची माहिती व वाहनांचे पेपर क्लिअर शासकीय दरात करून देणे असे निर्भय महाराष्ट्र पार्टी वाहतूक संघटना सर्वांसाठी काम करत असते.
यावेळी निर्भय महाराष्ट्र पार्टी वाहतूक संघटना अध्यक्ष योगेश कायस्थ व वाहतूक संघटनेचे पदाधिकारी तसेच रिक्षा चालक- मालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





