best news portal development company in india

सिन्नर तालुक्यात शर्यतीतील टांग्याला अपघात ,दुर्दैवाने बैल व घोडा मृतुमुखी …..

SHARE:

सिन्नर : सिन्नर तालुक्यातुन पंचाळे येथील कानिफनाथ महाराज यात्रा उत्सव निमित्त बैलगाडी शर्यत भरविण्यात आली होती, रंगपंचमीच्या आदल्या दिवशी शर्यत सुरू असताना निफाड तालुक्यातील बैलगाडी शौकीन शेतकऱ्याच्या बैलाचे विजु नावं असलेले बैल व घोडा घेऊन पंचाळे येथील टांगा शर्यतीत सहभागी झाले होते, परंतु शर्यत सुरू असताना शेजारील बैलाचा जोरदार धक्का बसला व बैल बिथरून सैराभैरा झाले व धावत सुटले व परिसरातील शेततळ्यात जाऊन पाण्यात पडुन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अन् अगदी ऐन रंगपंचमीच्या दिवशी या शेतकरी कुटुंबावर दुःख कोसळले आहे .

   रंग पंचमी निमित्त पंचाळे येथे कानिफनाथ महाराज यांच्या यात्रा भरते व या उत्सवात भर म्हणून यात्रेच्या आदल्या दिवशी भव्य अशा टांगा शर्यर्ती भरविण्यात येत आहेत परंपरा कायम राखली जावी यासाठी ग्रामस्थांनी टांगा शर्यतीचं आयोजन केलं होतं दरम्यान शर्यत सुरू असताना पवन या बैलाला शेजारच्या बैलाचा धक्का बसला व बैल बिथरून टांगा व घोड्यासह पळत सुटले व शेततळ्यात जाऊन पाल्टिक कागदात पाय अडखळले व घोड्यासह बैल पाण्यात बुडाले दुर्दैवाने बैलगाडी असलेलं दोर पायात अडकुन पडले त्यामुळे त्यांना पोहणे कठीण झाले होते. अशाच त्यांचा दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे टांगा शैकीनासह परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.
          या घटनेची माहिती गावातील लोकांना समजताच गावकऱ्यांनी शेततळ्या दिशेने धाव घेतली या बैल व घोडा यांना वाचवण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या व वाचवण्यासाठी दोन तास प्रयत्न केले परंतु पवन व विजु या घोडा व बैल जोडीला वाचवण्यात अपयश आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

पत्रकारभाऊसाहेब हांडोरे सिन्नर 

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई