best news portal development company in india

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या २०२५-२०२६ साठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीबाबत,महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नाबाबत केंद्र सरकारपुढे अनेक बाबींना खासदार राजाभाऊ वाजे यांनी वाचा फोडली…

SHARE:


  प्रतिनिधी:-भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर,नाशिकः  नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या २०२५-२०२६ साठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीबाबत चर्चासत्रात भाषण करताना महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नाबाबत केंद्र सरकारपुढे अनेक बाबींना वाचा फोडली.यावेळी, नदीजोड प्रकल्प, जलसंधारण, गोदावरी प्रदूषण ते नाशिक शहराचे प्रलंबित आणि बहूप्रतिक्षित एसटीपी प्रकल्प, मलजलवाहिन्या आदी मुद्द्यांवर भाष्य केले.
  यासोबत दमनगंगा, एकदरे – गोदावरी लिंक : नाशिकच्या विकासासाठी अतिरिक्त ५ टीएमसी पाणी मिळून, मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येईल.गारगाई, वैतरणा, कडवा, देवनदी लिंक  सिन्नर व उत्तर अहिल्यानगरच्या दुष्काळमुक्तीसाठी विशेष महत्वपूर्ण वैनगंगा, नळगंगा लिंक : विदर्भातील पाणीप्रश्नावर मात करणे होणार शक्य आहे.तसेच नार-पार, गिरणा लिंक : कसमादे, जळगाव आणि उत्तर मराठवाड्याचा भाग बागायती होण्यास मदत होईल.या प्रकल्पांना राष्ट्रीय प्रकल्प करण्याची मागणी यावेळी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केली.
तसेच, गोदावरी प्रदूषणावर बोलताना नाशिक शहरातील तब्बल २९हुन अधिक मलजलवाहिन्यामधून वाहणारे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सरळ गोदावरीत सोडले जात असल्याची गंभीर बाब निदर्शनास आणून देतांनाच, शहरातील मलनिस्सारण केंद्रांची (एसटीपी) तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता असून नव्याने मखमलाबाद आणि कामटवाडे येथे नवीन मलनिस्सारण केंद्र (एसटीपी) उभारण्याची गरज असल्याचं नमूद केलं. तसेच, औद्योगिक प्रदूषित पाण्यावर पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक सीईटीपी प्रकल्प उभारण्याची देखील मागणी यावेळी करण्यात आली. यासाठीचा आवश्यक असलेला ९०३ कोटींचा निधी केंद्र सरकारने तात्काळ वितरित करावा अशी देखील विनंती यावेळी खासदार राजाभाऊ(पराग) प्रकाश वाजे,लोकसभा सदस्य,नाशिक यांनी केली…

प्रतिनिधी:-भाऊसाहेब हंडोरे,सिन्नर

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई