best news portal development company in india

माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द करावी यासाठी शरद शिंदेपाटील व सिन्नरकरांच नासिक कलेक्टर कचेरी समोर उपोषण…

SHARE:

   
  सिन्नर:-गुन्हेगार माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द करावी यासाठी शरद शिंदेपाटील व सिन्नरकरांच नासिक कलेक्टर कचेरी समोर मंगळवार दि.१८मार्च सकाळी११ .०० वाजता उपोषण सुरू केले आहे.न्याय देवतेन २ वर्षे सजा सुनावली असे घर ढापे आमदार माणिकराव कोकाटेंची आमदारकी बरखास्त करावी.जर न्याय देवता निवडणूक खर्च वाचवायचा असे विचाराधीन असेल तर न्याय देवतेन२नंबरचा उमेदवार उदय सांगळे आमदार घोषित करावे.अन्यथा कपटीपणाने घात केलेल्या गरिब शरद शिंदे यांना आमदार घोषित करावे.
     कारण मतदानाच्या आदल्या दिवशी माणिकराव कोकाटेंनी जिल्हा पदाधिकारी विकत घेऊन स्वराज्य पक्षाचे गरिब ऊमेदवार शरद शिंदे यांची उमेदवारी रद्दचे खोटे पत्र काढुन बदनामी करत उमेदवारी रद्दचे गावोगावी जाहीर केले. अश्या शरद शिंदे यांना विजयी घोषित करावे.माणिकराव कोकाटेंनी षडयंत्राने शरद शिंदे यांचे बेनर फाडले,गाडी फोडली,दादागिरी केली,सभा अडवल्या किंवा रितसर ६महिन्यात सिन्नर विधानसभा पोटनिवडणूक घेऊन मतदारांना स्वच्छ आमदार निवडण्याचा हक्क दयावा. असे सिन्नर संघर्ष समिती ,स्वराज्य सिन्नर यांनी म्हटले…
निवेदन अर्ज: दि.१८/३/२०२५ रोजी खाली दिलेल्या मान्यवरांना निवेदन अर्ज सादर करण्यात आला आहे.
प्रती,माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्य,माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब,महाराष्ट्र राज्य,माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब,महाराष्ट्र राज्य,माननीय राज्यपाल साहेब,महाराष्ट्र राज्य,माननीय निवडणूक अधिकारी साहेब,महाराष्ट्र राज्य,माननीय विधानसभा अध्यक्ष साहेब,महाराष्ट्र राज्य,माननीय कलेक्टर साहेब,नासिक,पोलीस अधिक्षक साहेब/निरीक्षक साहेब,नासिक पोलीस स्टेशन,विषय-उपोषण करत खालील मागणी मान्य करणेबाबत
मागणी-१)कोर्टाने माणिकराव कोकाटे साहेब यांना दोन वर्षाची शिक्षा निकाल दिला आहेत. कायदया प्रमाणे२वर्षे किंवा जास्त सजा झालेल्या व्यक्तीला आमदार खासदार मंत्री पदावर रहाता येत नाहीत. माणिकराव कोकाटेंचा मंत्री व सिन्नर विधानसभा आमदार पदाचा राजीनामा घ्यावा या बरखास्त करावे.
२)वेळ न दवडता तातडीने सहा महिन्याचा आत पुन्हा सिन्नर विधानसभा निवडणुक घ्यावी.
३)निवडणूक खर्चाचे विचार करत ,कारण देत गुन्हेगार माणिकराव कोकाटेंना सिन्नर आमदार पदाची संधी देऊ नयेत. कायदयाप्रमाणे आमदारकी बरखास्त करावी.गुन्हेगार प्रव्रुती वाढण्यास मदत करु नयेत.
माननीय महोदय,
मी शरद तुकाराम शिंदेपाटील,सिन्नर विधानसभा निवडणुकीत उभा असलेला परंतु कोकाटेंनी कटकारस्थान करत उमेदवारी रद्दचे पक्ष जिल्हाध्यक्षा मार्फत पत्र काढुन,प्रचारात अडथळा,कार्यकर्ते मार्फत दादागिरी,गाडी फोडून, बॅनर फाडत त्रास दिलेले,निवडणूक लढवण्यास बाधा आणुन छळलेले समस्याग्रस्त व सिन्नरचे नागरिक आपणास कळवितो की, न्याय देवतेन माणिकराव कोकाटेंना चार सदनिका खोटी कागदपत्रे सादर करत लाटली म्हणून २वर्षे कारावास शिक्षा सुनावली आहेत.५०हजार रू.दंड केला आहेत.२वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या व्यक्तीला आमदार, खासदार या इतर निवडणूक लढता येत नाहीत. जर आमदार खासदार मंत्री असेल तर सदर पदावर रहाता येत नाही. नियमानुसार ते आमदार पद तात्काळ रद्द करावे.
माणिकराव कोकाटे वरच्या कोर्टात अपील करतील ते जरूर करावे.परंतु ते अपिल केल्यानंतर ती केस या मागिल केस प्रमाणे ५/१०/२०वर्षे चालू शकते.परंतु दोषी माणूस आमदार पद भोगतात कसे?आज न्यायालयाने दोन वर्षे शिक्षा सुनावली आहेत. तर तात्काळ माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा. सिन्नर विधानसभा निवडणुक घेऊन मतदारांच्या मताने विजयी स्वच्छ, सुसंस्कृत आमदार निवडण्याचा हक्क दयावा.गुन्हेगार आमदार कोकाटे पासून सिन्नरचा जनतेला मुक्ती दयावे.
   कारण माणिकराव कोकाटे लोकशाही पद्धतीने निवडणूका लढवलेली नाही ,राजकारण करत नाही. दहशतीने व पैशाचा वापर करत निवडणूका जिंकतात.ट्रकाच्या ट्रका दारु वाटत,पाजत युवापिढी नासवत निवडणुका जिंकतात. इतर उमेदवारांना निवडणूक खेळू देत नाहीत.लोकशाही नियमांना बाधा आणतात.यापूर्वी दिघोळेसाहेब,वाजेभाऊ यांनाही निवडणुकीत अडचणी आणल्या.२०२४ला तर शरद तुकाराम शिंदे उमेदवार असताना दादागिरी करत प्रचारात अडचणी आणल्या.बेनर फाडले,गावोगावी कार्यकर्ते करवी अडवले,गाडी फोडली.कटकारस्थान करत नेतृत्व व सेलेब्रिटी यांच्या सभा होऊ दिल्या नाहीत. जिल्हा पदाधिकारी यांना पैशाची लालुच देत शरद तुकाराम शिंदे यांची निवडणुक मतदान दोन दिवस अगोदर स्वराज्य पक्षातर्फे उमेदवारी रद्द पत्रक काढुन मिडीयात, गावोगावी जाहीर केले.माणिकराव कोकाटे गावोगावच्या तरूणांना निवडणूक काळात कोट्यावधी रुपयांची दारू पाजत निवडणूक जिंकतात.युवा पिढीच आयुष्य उध्वस्त करत निवडणूक जिंकतात. हे थांबल पाहिजे.लोकशाही गोरगरीब जनतेपर्यंत पोहचली पाहिजे .सामान्य माणूस निवडणूकीत उभा राहिला पाहिजे लोकप्रतिनिधी झाला पाहिजे असा घटनेचा उद्देश हे माणिकराव कोकाटे पायदळी तुडवतात.
   सिन्नर तालुक्यात ३ महिन्यात ५ / ६ खुन झाले, दिवसाढवळ्या गोळीबार, हाणामाऱ्या तर गणती नाहीत. कायदा व्यवस्थेचा बोजवारा उडालाय.बीड पेक्षा भयानक परिस्थिती सिन्नर तालुक्यात आहेत. कुणी आवाज उठवत नाहीत. जनता,विरोधी पक्ष पदाधिकारी, मिडिया कोकाटें विरोधात एक चकार शब्द बोलत नाही छापत नाही सारे दबावाखाली आहेत.इतकी कोकाटेंची दादागिरी ,दहशत आहेत.
कृपया सदर कायदयाने रद्द झालेले माणिकराव कोकाटेंच आमदार पद व मंत्री पद तात्काळ कारवाई करत रद्द करावे.पुन्हा ताबडतोब सिन्नर विधासभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेत नवीन लोकप्रतिनिधी मिळावा.
परंतु वरच्या कोर्टात अपील केले म्हणून इतर निवडणूका प्रमाणे सिन्नर विधानसभा निवडणूक लांबवु नयेत.
तसेच सन्मानानिय न्यायालय आज निवडणूक खर्च कारण करत स्थगिती देत असेल तर तो मतदार व जनतेवर अन्याय आहेत.जनतेत चुकीचा मेसेज जात आहेत. गुन्हेगाराला पाठीशी घातले जातेय की काय?.उदया कुणीही महिलेवर अत्याचार करेन,खुन करेन आणि मग या केसचा सहारा घेत निवडणूक खर्चाचे कारण देत लोकप्रतिनिधी पदावर राहील.लोकशाही गुन्हेगार, गुंडाच्या हाती दयायच का? असे गुन्हेगार आमदार खासदार मंत्री पदावर ठेवायचे का?सामान्य जनतेच काय?असा जनता आज विचारत आहेत. यामुळे चुकीचा पायंडा पडेल.गुन्हेगारी करणारयाना बळ मिळेल.गुन्हेगारी प्रवुत्ती वाढेल.जर खर्चाचा विचार आपण करत असाल तर मग आज विधान परिषद निवडणूक लागली आहेत. कारण यातील काही लोकप्रतिनिधी २०२४निवडणुकीत विधानसभेला उभे होते म्हणून जागा रिक्त होऊन मुदतीचा आत निवडणूक लागली आहेत. मग तो खर्च जनतेचा नाही का?पक्षांतरामुळे मुख्यमंत्री पाय उतार होतात. नवीन मुख्यमंत्री ,नवीन निवडणूक तो व्यर्थ खर्च नाहीत का?उदा.शरद पवार साहेब यांनी सरकार पाडत मुख्यमंत्री झाले.पहाटेचा शपथविधी, निवडणूक विरोधात लढलेले एकत्र येत उध्वजी ठाकरे मुख्यमंत्री.अडिच वर्षात राजीनामा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, गुवाहटी प्रकरण,आदरणीय अटलजींचे सरकार १खासदार कमी म्हणून पडले.फेर निवडणूका झाल्या.आज ४वर्षे झाले नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका नाहीत. जनतेला लोकप्रतिनिधी नाहीत. प्रश्न सोडवण्यासाठी जनतेन जायच कुणाकडे?हा विचार का करत नाही?
निवडणूक खर्च वाचवायचा आपण विचार करत असाल तर दोन नंबरची मत मिळालेला उमेदवार उदय सांगळे विजयी घोषित करु शकता. किंवा कोकाटेंनी गरिब उमेदवार शरद तुकाराम शिंदेपाटील यांची कपटाने वरिष्ठ पदाधिकारी यांना लालुच देत उमेदवारी रद्दचे पत्रक काढले जे नियमात नाही.दादागिरी करत प्रचारात अडथळे आणत निवडणुकीत थांबवले ,अडथळे आणले .त्यांचा खर्च,परिश्रम वाया गेले कर्जबाजारी झाले.मानसिक, आर्थिक नुकसान केलेल्या  शरद तुकाराम शिंदे यांना विजयी करु शकता.वेगळा सकारात्मक मेसेज जाईल. दादागिरी, गुन्हेगारी लोकांना चपराक बसेल.
खर्चाचा विचारा पेक्षा गुन्हेगाराला पाठीशी घालणे किंवा आमदार खासदार मंत्री पदावर ठेवणे हे गंभीर आहेत.जनतेचा न्याय देवतेकडे बघण्याचा द्रुष्टीकोन ,विश्वास यास तडा जात आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहणार नाहीत. गुन्हेगारी कमी होण्या ऐवजी वाढु शकते.आणि मग३०वर्षे अभ्यास, पुरावे यावर आदरणीय कोर्टाने२वर्षे शिक्षा दिली त्या निर्णयाच काय?आज दुसरे कोर्ट गुन्हेगार कोकाटेंचा आमदारकीचा विचार करतेय कायदा बदलत.का निर्णय बदलवला?याचा जनतेन वेगळा विचार होत आहेत.जनतेचा विश्वास राहील न्याय देवतेवर?असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.प्रश्न आमदारकीचा नाही तर काळ सोकावतोय.आदरणीय कोर्टाने,सरकारने गुन्हेगार माणिकराव कोकाटेंची सिन्नर विधानसभा आमदरकी बरखास्त करावी.पावसाळयापुर्वी निवडणूक जाहीर करून सिन्नरच्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार निवडण्याचा हक्क दयावा. यासाठी सोमवार दिनांक२४/२/२०२५रोजी सिन्नर तहसील कार्यालय समोर न्याय देवतेचा सन्मान ठेवत उपोषण करत मागणी करत उपोषण केले होते. आज दि.१८मार्च रोजी कलेक्टर कचेरी नासिक समोर उपोषण करत वरिल मागणी करत न्याय मागत आहोत. कायदा सुव्यवस्था पाळत लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन करत आहोत...कृपया न्याय मिळावा हि विनंती….
कळावे आपला
श्री,शरद तुकाराम शिंदेपाटील,संघर्ष समिती सिन्नर, मो.9689350622
शरद शिंदे पाटील सह शिवाजी गुंजाळ, क्रुष्णा लहाणे,संजय कुराडे,शरद धनराव,चिंधुभाऊ गुंजाळ अनिल गायकवाड,स्वराज लोंढे, साईनाथ हिवर,प्रमिलाताई लोंढे,निशाताई वराडे,मंगलाताई मोरे,विठाबाई लोंढे,देवयानी खर्डे,हिरामण काकड हे सहभागी आहे…

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई