राज्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी हवामानाचा अंदाज अत्यंत महत्त्वाचा असतो….
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नुकताच आपला नवीन पंजाबराव डख अंदाज 2025 प्रसिद्ध केला. 
हवामानाच्या अंदाजानुसार राज्यात 15 मार्च पासून तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे, तर 20 मार्च नंतर अवकाळी पावसाची शक्यता आहे हवामान अंदाजानुसार 15 ते 17 मार्च या कालावधीत राज्यभर ढगाळ वातावरण राहणार आहे, आणि आकाश सतत मळ भरलेले राहील.
विशेषतः नागपूर,भंडारा,गोंदिया आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे, मात्र राज्यातील इतर भागात पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. या कालावधीत हवामान थोडेसे थंडसर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 20 मार्च नंतर राज्यात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता सांगण्यात येत आहे पावसाचा फटका 20 मार्च नंतर काही ठिकाणी गारपीट जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. तापमानातील चढ-उतार या काळात तापमानात कमी जास्त होऊ शकते, ज्याचा परिणाम पिकावर होऊ शकतो.
विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अधिक धोका या भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला:-
हवामान अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात कांदा, हरभरा आणि गहू 20 मार्चपूर्वी काढणी करून घ्यावी, इतर पिके ज्या पिकांची काळजी शक्य असेल ते वेळेत पूर्ण करावी. अवकाळी पावसामुळे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, शेतकऱ्यांनी आपले पिके सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अवकाळी पावसामुळे नुकसान होऊ नये त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे,
हवामान बदलाचा इशारा पुढील काही दिवस महत्त्वाचे….
अभ्यासात पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे की 20 मार्च नंतर हवामान आणखी खराब होण्याची शक्यता आहे,महाराष्ट्राच्या उत्तरार्धत पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची वेळीच काढणी करावी.
राज्यभर ढगाळ वातावरण राहील त्यामुळे अचानक हवामान बदलू शकते पावसामुळे काही भागात नुकसान होण्याची शक्यता असल्याने एग्रीकल्चर इन्शुरन्स बाबत विचार करावा,सध्याची परिस्थिती घाबरण्याचे कारण नाही,15 ते 17 मार्च या कालावधीत फक्त वातावरण ढगाळ राहणार आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही मात्र 20 मार्च नंतर हवामान आणखीन बिघडण्याची शक्यता असल्याने सतर्क राहणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना वेळीच आपल्या पिकांची काळजी करून घेणे गरजेचे आहे व त्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




