नाशिकः: नुकतेच काही दिवसापूर्वी निफाड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडून त्यावर कारवाई करण्यात आली त्याच अधिकारी व कर्मचारी यांच्या भ्रष्टाचारा चा निषेध म्हणून निर्भय महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष यांनी प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली,याचे पडसाद पूर्ण देशभर पडले असून जिल्ह्यातील नागरिकही झालेल्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत जागे झाले आहेत.
असेच निफाड तालुक्यातील नैताळे नागरिकांनी झालेल्या भ्रष्टाचाराबाबत माहिती उघड केली. नैताळे गावचे माजी सरपंच राजेंद्र रामनाथ बोरगुडे यांनी गावातील सार्वजनिक मालमत्तेची गावतलाठी, सर्कल, तहसीलदार यांच्या माध्यमातून तुकडे करून परस्पर आपल्या कुटुंबीयांच्या नावावर केल्याचे निदर्शनात आले आहे, असे नैताळे येथील ग्रामस्थांनी सांगितले, याबाबत गावातील नागरिकांनी तक्रार दाखल
केली आहे,संजय तात्या बोरगुडे,महेश बाळासाहेब बोरगुडे,दादासाहेब बाबुराव बोरगुडे,अरविंद गणपत बोरगुडे, बाळासाहेब भाऊराव बोरगुडे यांनी तक्रार दाखल केली आहे, याबाबत त्यांचे उपोषणाला बसण्याचीही तयारी असल्याचे सांगण्यात येत आहे, निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून न्याय मिळेल अशा अपेक्षेने त्यांनी,, अध्यक्ष-जितेंद्र भावे, निर्भय महाराष्ट्र पार्टी, यांना भेटून योग्य तो न्याय मिळवून द्यावा असे गावकऱ्यांनी सांगितले.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




