best news portal development company in india

चांदवड होळकर वाडा( रंग महाल) येथे मल्हारराव होळकर यांच्या जन्मदिनी नर्मदा गोदावरी जलाने श्री समाधान बागल यांच्या हस्ते जलाभिषेक ….

SHARE:

   भारताला आपल्या तलवारीच्या जोरावर हालवून सोडणारे , फक्त मल्हार आया म्हणताच हजारोंच सैन्य माघारी फिरायचे एवढी विरता असुनही आपल्या सुनेला मुलाप्रमाणे सांभाळुन ह्या भारत वर्षासाठी एक अहिल्यादेवी नावाच सुवर्ण पान घडवणारे सुभेदार मल्हारराव होळकर यांची आज जयंती….

aonenewsmaharashtra@gmail.com

  चांदवड,16 मार्च:-दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदुस्थानचे युगपुरुष सुभेदार मल्हारराव होळकर यांचा जन्मोत्सव गेल्या दोन-तीन वर्षापासून होळकर वाडा चांदवड येथे साजरा केला जात आहे. यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रीशताब्दी वर्ष व मल्हार होळकर यांचा जन्मोत्सव पुढील थोड्या दिवसात संयुक्त जन्मोत्सव होणार आहे. परंतु आज तिथीनुसार मल्हारराव होळकर यांच्या नर्मदा गोदावरी यांच्या तीर्थ जलाने जलाभिषेक करून. मातोश्रींच्या मूर्तीला पुष्पहार घालून हा जन्मोत्सव वैदिक पद्धतीने साजरा करण्यात आला.विशेष म्हणजे ही होळकर नगरी मल्हारराव होळकरयांनी वसवलेली आहे.या ठिकाणी मल्हार गड म्हणून आजचा चंद्रेश्वरी म्हणून प्रसिद्ध आहे.त्याकाळी मल्हार गडावरती टाकसाळ होती. चांदवडी रुपया हा संपूर्ण भारतभर प्रसिद्ध होता.
आज रोजी चांदवड रंगमहाल या ठिकाणी सुभेदार मल्हारराव होळकर जयंती सोहळा पार पडला.
    ज्याप्रमाणे होळ मुरुम येथे हा उत्सव साजरा करतात तशीच आम्ही आज चांदवडला रंगमहालात पुजा केली कारण चांदवड ही होळकर राज्याची उपराजधानी आहे व आजचा शुभदिनी अखंड भारतात ही जयंती व्हावी व सुभेदारांची किर्ती परत सगळ्यांना माहीत व्हावी ह्यासाठी आज हे स्थळ निवडले आहे कारण जिथे जिथे सुभेदारांचे पाय लागले ती प्रत्येक जागा हिंदुमय होत गेली हे आपण विसरता कामा नये.
. यानिमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री समाधानजी बागल, भूषण जाधव उपस्थित होते, यांच्या हस्ते सकाळी सूर्योदयाच्या वेळी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या पुतळ्याची पूजा व अभिषेक करण्यात आला, या अभिषेकासाठी अमोल दिक्षित गुरुजी यांनी नर्मदा गोदावरी नद्यांचे जल आणले होते या नर्मदा गोदावरी जलाने अभिषेक करण्यात आला.
  याप्रसंगी श्री समाधान बागलजी यांनी बोलताना सांगितले की सुभेदार मल्हारराव होळकर हे एक युगपुरुष होते, आणि त्यांनी मराठी माणसाचं नाव अगदी देशाच्या पलीकडे म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमा पर्यंत नेऊन धडकवले आणि म्हणून मल्हारराव होळकर हा एक प्रेरणेचा स्रोत आहे एखाद्या सामान्य घरातून येऊन असामान्य कीर्ती करणाऱ्या दिग्गजामध्ये मल्हाराव होळकर हा एक सर्वोत्तम आदर्श आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगी बांधून आणि महाराष्ट्राच्याही बाहेर निघून किंबहुना आजच्या भारत देशाच्या बाहेर असणाऱ्या अटक सारखे ठिकाण पर्यंत जाऊन धडक मारण्यासाठी त्यांनी आपल्या सेनेचे नेतृत्व केलं एवढेच नाही तर पानिपतच्या युद्धामध्ये सैन्याची आणि मराठा माणसाची हानी झाल्यानंतर सुद्धा मल्हारराव होळकरांनी तेवढ्याच ताकतीने सर्व मराठा साम्राज्य परत एकदा उभा करून दिलं अश्या  मल्हारराव  होळकर यांची जयंती फक्त एका होळ मुरूम मध्ये का व्हावी तर मल्हारराव होळकरांचा आदर्श या मातीच्या कणाकणात आहे आणि म्हणून जिथे जिथे मल्हारराव होळकरांचे पाय पडले ती प्रत्येक जागा हिंदूमय होत गेली. अगदी दिल्लीपासून ते अटक पर्यंत असं खूप मोठे उदाहरण आपण घेऊ शकतो, म्हणून मल्हार राव होळकर यांची जयंती ही प्रत्येक होळकर किल्ल्यावर प्रत्येक होळकरांच्या वाड्यावर जिथे तिथे होळकरांचा वाडा असेल त्या प्रत्येक ठिकाणी ही जल्लोषात व्हायला हवी असे श्री.बागल यांनी सांगितले.
    ज्याप्रमाणे मातोश्री अहिल्यादेवींची जयंती आपण साजरी करतो त्याचप्रमाणे मल्हारराव होळकर यांचीही जयंती ही संपूर्ण हिंदुस्थानात साजरी झाली पाहिजे कारण नुसता मल्हारा या नाव ऐकल्यानंतर राजे गाद्या सोडून पळत होते आणि सैन्य नुसतं नाव ऐकून माघारी पळत होतं एवढी जरब ज्या माणसाची होती पण ही जबर सत्यासाठी , धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी होती  म्हणून असे प्रत्येक मराठी माणसासाठी आदरणीय असलेलं नेतृत्व या भारत देशासाठी एक मुलुख मैदानी तोफ म्हणून एक महापराक्रमी योद्धा म्हणून आणि त्याचबरोबर या भारत वर्षाला हिंदूमय ठेवण्यासाठी काम करणाऱ्या एका महान भारतभूमीच्या लेकाची जयंती ही संपूर्ण हिंदुस्थानात साजरी होणं गरजेचं आहे.           

 

 

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई