नाशिकः
यशस्वी सापळा युनिट नाशिक यांची कारवाई
दिनांक 21/02/2025 लाचेचे कारण :- यातील तक्रारदार हे शासकीय नोकर असून त्यांना अपघात होऊन त्यांच्या हाताच्या उजव्या कोपरास दुखापत झाली होती. सदर बाबत त्यांनी खाजगी दवाखान्यात उपचार घेतले होते व कर्तव्यावर हजर होणे कामी त्यास शासकीय जिल्हा रुग्णालय, नाशिक येथून fit for duty असे प्रमाणपत्र पाहिजे होते. त्यासाठी त्यांनी दिनांक 21/02/2025 रोजी जिल्हा रुग्णालय येथे OPD पेपर काढला होता. तेव्हा सदरील OPD पेपरवर ड्युटीवर असलेल्या डॉक्टर यांनी Pt fit for duty असा रिमार्क मारला. तेव्हा तक्रारदार यांनी त्यांच्याकडे असलेल्या शासकीय रुग्ण निवेदन केलेल्या प्रमाणपत्राच्या पाठमागील बाजूस असलेल्या प्रमाणपत्र यावर सदर नोंद घेण्यास सांगितले असता त्यांनी मामा ला जाऊन भेटा ते पुढचे प्रमाणपत्र देतील. त्यावर तक्रारदार हे लोकसेवक आरोपी – नितीन रामचंद्र तिवडे, वय – 56 वर्षे, धंदा – नोकरी, कक्ष सेवक, जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक राहणार – शिवपुष्प सोसायटी, रो हाऊस नंबर 23, मीरा द्वार लॉन्स समोर, माने नगर, मेरी- रासबिहारी लिंक रोड नासिक.. यास भेटले असता त्यांनी तक्रारदार यास सदरील प्रमाणपत्र यावर fit for duty असा रिमार्क मारून आणून देण्याच्या मोबदल्यात 1500/- रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांना आरोपी लोकसेवक यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांना संपर्क केला असता तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आले व यशस्वी सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक यांनी मागणी केली केलेली लाचेची रक्कम स्वीकारली व तक्रारदार यांच्याकडे असलेल्या सिक पास वर fit for duty असा रिमार्क मारून Medical officer CL -2, General Hospital, Nashik असा शिक्का मारून दिला म्हणून आरोपी लोकसेवक आरोपी – नितीन रामचंद्र तिवडे, वय – 56 वर्षे, धंदा – नोकरी, कक्ष सेवक, जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक राहणार – शिवपुष्प सोसायटी, रो हाऊस नंबर 23, मीरा द्वार लॉन्स समोर, माने नगर, मेरी- रासबिहारी लिंक रोड नासिक.. विरुद्ध गुन्हा दाखल केला.
सापळा व तपास अधिकारी-श्री. संदीप घुगे,
पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक.
सापळा पथक-पोलीस हवालदार गणेश निंबाळकर,
पोलीस शिपाई नितीन नेटारे.
मार्गदर्शक –
श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,
पोलीस अधीक्षक,
ला.प्र.वि.नाशिक परीक्षेत्र, नाशिक
मो.न .9371957391
आरोपी यांचे सक्षम प्राधिकारी – जिल्हा शल्य चिकित्सक,
शासकीय जिल्हा रुग्णालय, नाशिक
…………………………………………………………
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे संपर्क करावा:-
दुरध्वनी क्रमांक.
02532578230
’टोल फ्री क्रमांक १०६४
=================
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





