निफाड तालुक्यातील रानवड येथे आयशर ट्रकमुळे रस्त्याच्या कडेने चाललेल्या मेंढ्यांचा अपघात एक मेंढी मृत्युमुखी….
मेंढपाळ बांधवांचे जीवन……
नाशिकः
नांदगाव तालुक्यातील वखारी गावातील साहेबराव शर्माळे मेंढपाळ कुटुंब आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्या मेंढ्यांच्या वाड्यासहित निफाड तालुक्यात रानवड येथे आपले बिऱ्हाड घेऊन आपल्या कुटुंबाचे उदार निर्वाह करण्यासाठी आज पोहोचला असता, व आजच रस्त्यावरून जात असताना समोरून येणारा आयशर ट्रक MH 15 DK 3595 वरील ड्रायव्हर सचिन जाधव राहणार वडाळी येथील याने ट्रक वरील लक्ष विचलित करून रस्त्याच्या कडेला चालत असणाऱ्या मेंढ्यांचा अपघात झाला, यामध्ये एक मेंढी मृत पावली. म्हणून तेथून ड्रायव्हरने पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु मेंढपाळ आर्मी संकट असलेले समाधान बागल यांना घटनेची माहिती कळतात बागल यांनी तेथील आजूबाजूचे समाज बांधव यांना त्वरित माहिती दिली व लगेचच त्या ठिकाणी मेंढपाळ आर्मीची टीम पोहोचली, आजूबाजूच्या असलेल्या सहकाऱ्यांनी तसेच गोरख भाऊ गाडे,योगेश गोराणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी भेट दिली व ड्रायव्हर बद्दल गाडी मालकाला फोन करून घडलेला घटनाक्रम सांगून झालेल्या अपघातात नुकसान भरपाई ची मागनी केली. या एक दोन तास चाललेल्या गोंधळात ड्रायव्हरचे मॅनेजर यांनी आर्थिक मदत देण्याचे कबूल केले. व मेंढपाळ बांधवांना मदत मिळवून दिली. परंतु ही मदत महत्त्वाची नसून या बांधवांना आपले जीवन जगण्यासाठी दिवस दिवस रानावनात फिरावे लागते, व झालेल्या अपघात नुकसानीचे पोलीस फक्त गुन्हे नोंदवून मोकळे होतात. परंतु त्यापासून कुठल्याही प्रकारे मदत मिळत नाही. त्यासाठी प्रशासनाकडे मदत मागावी की नाही हा प्रश्न पडलेला आहे व मदतीसाठी मेंढपाळांना मेंढ्या सोडून वारंवार जाणे येणे होत नाही व परवडत नाही.
म्हणून मेंढपाळांना शासनाने मदत मिळवण्यासाठी योग्य ती नियमावली करून कमीत कमी वेळेत कमीत कमी जाणे येण होईल व लवकरात लवकर भरपाई मिळावी असे निर्णय घ्यावे.
मेंढपाळ बांधवांची ही परिस्थिती बघून मन हेलावुन जाते. मेंढपाळ बांधवांना कुठल्याही प्रकारे अपघात झाल्यानंतर विमा मिळत नाही किंवा कुठल्याही सरकारी निधी मदत मिळत नाही. सरकारने याकडे लक्ष देऊन मेंढपाळ बांधवांना मदत द्यावी आणि मेंढपाळ बांधवांचा सरकार तर्फे विमा उतरवावा. गेली दीड महिन्यात महिन्यात चांदवड येथे दोन ते तीन अपघात झाले. मेंढपाळ बांधवांना मेंढ्या चारण्यासाठी ग्रेझिंग कोरिडॉर तयार करावे. मेंढपाळांवरती होणाऱ्या हाल्यावरती सरकारने कठोर कारवाई करावी.शासकीय व्यवस्था जागी कधी होणार…?
मेंढपाळांना संरक्षण कधी मिळणार.. असा सवाल केला
श्री समाधान बागल,
गोरक्षक,मेंढपाळ आर्मी नाशिक जिल्हा महाराष्ट्र राज्य.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





