best news portal development company in india

रामकुंड-अहिल्या घाटावर भक्तीचा महासागर; पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा ३०१ वा जयंती सोहळा भव्य-दिव्य उत्साहात संपन्न

SHARE:



प्रतिनिधी:एवन न्युज महाराष्ट्र,नाशिक

नाशिक:हिंदू धर्म रक्षक, लोकमाता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त रामकुंड, अहिल्या घाट, पंचवटी येथे आयोजित करण्यात आलेला भव्य-दिव्य जन्मोत्सव सोहळा धार्मिक, सांस्कृतिक आणि भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावत लोकमातेप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.



सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते नर्मदा कलश पूजन आणि पवित्र नर्मदा जलाने करण्यात आलेला जलाभिषेक. होळकर राजघराण्याचे उत्तराधिकारी महाराजा यशवंतराव होळकर (तृतीय) यांच्या वतीने दरवर्षी देशभरातील अहिल्या स्मारकांसाठी पाठविण्यात येणाऱ्या नर्मदा कलशाची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली. नाशिक येथे प्राप्त झालेल्या नर्मदा कलशाचे विधिवत पूजन करून अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पवित्र नर्मदा जलाने अभिषेक करण्यात आला.

यावेळी होळकर घराण्याचे वंशज मुकुंद राजे होळकर, उपमहापौर विलास आण्णा शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, राजेंद्र बागुल यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते नर्मदा कलश पूजन व जलाभिषेक करण्यात आला.



समितीचे संस्थापक अध्यक्ष समाधान बागल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. विशेष म्हणजे महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देत शिवसेना महिला जिल्हाप्रमुख संगीता ताई पाटील यांना ३०१ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षपदाचा मान देण्यात आला. त्यांच्या प्रभावी नेतृत्व आणि नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

यंदाच्या सोहळ्याची संकल्पना “महाकुंभ” अशी ठेवण्यात आली होती. त्यानुसार रामकुंड आणि अहिल्या घाट येथे भव्य महा गोदावरी आरती आणि अहिल्यादेवी आरतीचे आयोजन करण्यात आले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या आरतीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने ओथंबून गेला. आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची आरास, दीपप्रज्वलन आणि धार्मिक विधींमुळे परिसराला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव प्राप्त झाले.

कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर करण्यात आलेल्या भव्य आतषबाजीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. “लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो” या जयघोषांनी संपूर्ण रामकुंड परिसर दुमदुमून गेला.

यावेळी विनायकजी काळदाते, दत्तूभाऊ बोडके, रामदास सकाळे, शशिकांत कोथमिरे, नगरसेविका सुलोचना होळकर, अमोल गजभार, नगरप्रमुख रागिनी बोराडे-धोंगडे, शिवसेना संघटक पिता गुप्ता, युवती विधानसभा प्रमुख अर्चना भाबड-गोसावी, वैभव रोकडे, अण्णासाहेब सपकाळ, राजाभाऊ बादाड, काळे ताई, देवरामभाऊ रोकडे, शिरोळे सर, मांडले सर, हेमंत शिंदे, आबासाहेब तरफले, प्रशांत बागल, भूषण जाधव, संदेश मोरे यांच्यासह सामाजिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने अहिल्याप्रेमी नागरिक उपस्थित होते.



उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि धर्मरक्षक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा समाजात व्यापक प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच त्यांच्या आदर्शांवर चालत समाजसेवा आणि राष्ट्रसेवेची भावना अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व मान्यवर, स्वयंसेवक, सहकारी, देणगीदार आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानले. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा जागर देशभर पोहोचविण्याच्या उद्देशाने भविष्यातही अशाच भव्य उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई