best news portal development company in india

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान सोहळा : सामाजिक कार्यासाठी संगिताताई मालकर यांचा जिल्हाभर गौरव

SHARE:

प्रतिनिधी : दत्तात्रय घुले धामोरी (अहिल्यानगर)
अहिल्यानगर : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार आज अहिल्यानगर येथील कलेक्टर कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात प्रदान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संगिताताई मालकर यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.


हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत संगिताताई मालकर यांनी सन्मान स्वीकारला.
महिला सक्षमीकरण, बालकल्याण आणि सामाजिक जागृती या क्षेत्रात सातत्यपूर्ण व परिणामकारक कामगिरीची दखल घेत त्यांच्या निवडीस मान्यता देण्यात आली. शासनमान्य या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला अधिक बळ मिळाले आहे.
कलेक्टर कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्याला विविध अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, हा पुरस्कार प्राप्त झाल्याने संगिताताई मालकर यांच्यावर संपूर्ण जिल्हा व तालुका स्तरावरून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यांच्या या सन्मानामुळे सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना प्रेरणा मिळत आहे.

सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी“एवन न्यूज महाराष्ट्र”
संपादक:अरुण चंद्रभान गायकवाड
उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे
प्रतिनिधी:दत्तात्रय घुले
एवन न्यूज महाराष्ट्र
धामोरी
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई