best news portal development company in india

कारवाडीत भक्तीचा महाकुंभ! श्री स्वामी समर्थ केंद्राचा नूतन वास्तू शांती व भव्य लोकार्पण सोहळा संपन्न होणार…
संत-महंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा; ‘न भूतो न भविष्यती’ सोहळ्याचे कारवाडीत आयोजन…

SHARE:

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
‘इवलेसे रोप लवियेलें द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावेरी’ या उक्तीप्रमाणे कारवाडी (ता. सिन्नर) येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राच्या छोट्याशा रोपट्याचा आज एक विशाल वटवृक्ष झाला आहे. परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या कृपाशीर्वादाने आणि मार्गदर्शक श्री. संतोषभाऊ जाधव यांच्या निस्वार्थ नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या या केंद्राचा नूतन वास्तू शांती व भव्य लोकार्पण सोहळा उद्या, १५ मे रोज अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न होत आहे.


कारवाडी येथील हे केंद्र आता एका भव्य-दिव्य वास्तूच्या रूपात साकार झाले असून, ते संपूर्ण पंचक्रोशीसाठी एक ‘महातीर्थ’ ठरणार आहे. वेदमंत्रांच्या दिव्य घोषात, टाळ-मृदंगांच्या निनादात आणि सिद्धांच्या पावन उपस्थितीत प्रत्यक्ष ब्रह्मांडनायक **दत्तप्रभू श्री स्वामी समर्थ महाराज विग्रह स्वरूपात या ठिकाणी विराजमान होणार आहेत. या सोहळ्यासाठी संपूर्ण कारवाडी ग्रामस्थ आणि सेवेकरी सज्ज झाले असून भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता सर्व नियोजन पूर्ण करण्यात आले आहे.
या ‘न भूतो न भविष्यती’ अशा ऐतिहासिक सोहळ्यास अनेक थोर संत-महंत आणि राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात प्रामुख्याने:
परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे (दिंडोरी प्रणित सेवामार्ग)
महंत गुरुवर्य स्वामी रमेश गिरी महाराज (मठाधिपती, गोदा धाम सरला बेट) महंत स्वामी रमेश गिरीजी महाराज (जनार्दन स्वामी समाधी स्थान, कोपरगाव बेट)महंत महामंडलेश्वर परमहंस श्री काशिकानंद गिरीजी महाराज सरस्वती(हरिपाठ आश्रम, शिर्डी)
Miमहंत राकेश्वरगिरीजी महाराज(रामेश्वर आश्रम, कुंभारी)
श्री. सुरेश चव्हाणके(संस्थापक, सुदर्शन न्यूज चॅनल, दिल्ली)
श्री. माणिकराव कोकाटे(आमदार, सिन्नर विधानसभा)
श्री. राजाभाऊ वाजे(खासदार, नाशिक)श्री. आशुतोष काळे(आमदार, कोपरगाव विधानसभा) श्री. विवेकभैय्या कोल्हे(आमदार, विधान परिषद) सौ. रुपाली निलेश जाधव (सरपंच, कारवाडी)भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन


या सोहळ्याबाबत माहिती देताना केंद्राचे मार्गदर्शक श्री. संतोषभाऊ जाधव म्हणाले की, “अनेक सेवेकर्‍यांच्या अथक परिश्रमातून आणि स्वामींच्या कृपेने ही वास्तू उभी राहिली आहे. या महापर्वणी प्रसंगी सर्व देवतांचा अदृश्य वास या ठिकाणी असणार आहे. तरी सर्व भाविकांनी या दिमाखदार सोहळ्यात सहभागी होऊन, दर्शन घेऊन आपली सेवा रुजू करावी.”
कारवाडीतील या नूतन वास्तूच्या लोकार्पणामुळे आध्यात्मिक ऊर्जेचे एक नवीन केंद्र निर्माण झाले असून, परिसरात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण पसरले आहे.

सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी“एवन न्यूज महाराष्ट्र” संपादक:अरुण चंद्रभान गायकवाड ९४२२९५२५१३
उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे ९६३७१००६०८
प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे
एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई