best news portal development company in india

सिन्नरमध्ये जल्लोष! बच्चुभाऊ कडू यांची विधानपरिषद आमदारपदी निवड; शिवाजी चौकात पेढे वाटून आनंदोत्सव…

SHARE:


प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे सिन्नर,दिनांक: ८ मे २०२६

सिन्नर:जनसामान्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे बच्चुभाऊ कडू यांची विधानपरिषद आमदारपदी निवड झाल्याची घोषणा होताच सिन्नर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सिन्नरमधील ऐतिहासिक शिवाजी चौक, सिन्नर येथे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला.


कार्यक्रमाची सुरुवात चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. “बच्चुभाऊ कडू तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी कार्यकर्त्यांनी नागरिक व व्यापाऱ्यांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला. बच्चुभाऊंच्या निवडीमुळे सामान्यांचा आवाज विधानपरिषदेत अधिक प्रभावीपणे पोहोचेल, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
   या आनंदोत्सवात राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. यामध्ये गणेश मस्के, आयरन जाधव, नगरसेविका जाधव मॅडम, गणेश खर्जे, कैलास दातीर, संगीता आगळे, पुष्पा भोसले, पांडुरंग आगळे, योगेश कहांडळ, सुनील जगताप, चंद्रकांत डावरे, प्रकाश थोरात, आशाताई गोसावी, पिंटू नागरे, भास्कर ठोंबरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
“शेतकरी, कष्टकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी बच्चुभाऊ कडू यांनी सातत्याने लढा दिला आहे. त्यांच्या निवडीमुळे सिन्नरसह राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे,” असे मत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. ढोल-ताशांच्या तालावर नाचत आणि गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी शिवाजी चौक परिसर भगवामय केला.

एवन न्यूज महाराष्ट्र साठी — सिन्नर प्रतिनिधी.

सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी“एवन न्यूज महाराष्ट्र” संपादक:अरुण चंद्रभान गायकवाड- 9422952513 उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे- 9637100608
प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे
एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई