प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे, सिन्नर
सिन्नर:वादळ-वारे असोत, पाऊस असो किंवा अंगाची लाही लाही करणारे ऊन — या सगळ्यांवर मात करत शेतकरी आपल्या शेतात खंबीरपणे उभा आहे. सध्या सिन्नरच्या ग्रामीण भागात उन्हाची तीव्रता इतकी वाढली आहे की सामान्य माणूस घराबाहेर पडायलाही घाबरतो; मात्र शेतकरी याच जळत्या उन्हात अंगावर आग घेऊन दिवसभर शेतात राबताना दिसतो.
डोक्यावर तडाखेबंद ऊन, पायाखाली तापलेली जमीन, घामाने निथळलेले शरीर — तरीही त्याच्या कष्टाला विश्रांती नाही. कारण त्याच्या संघर्षामागे स्वतःचे पोट, कुटुंबाची जबाबदारी आणि शेतीवरील विश्वास आहे. दिवस-रात्र मेहनत करून, जीव तोडून कांद्याचे पीक उभे करणाऱ्या शेतकऱ्याला बाजारात मात्र या कांद्याला फक्त ७ ते ८ रुपये किलो असा कवडीमोल भाव मिळत आहे.
शेतकऱ्याचा हा विरोधाभास अत्यंत वेदनादायी आहे. एका बाजूला प्रचंड कष्ट, वाढलेला उत्पादन खर्च, खत-औषधे, मजुरी, पाणी, वाहतूक यांचा बोजा; आणि दुसऱ्या बाजूला बाजारातील पडलेले दर. एवढ्या श्रमांनंतरही हातात काहीच राहत नसल्याने शेतकरी हताश होत आहे.
स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “आम्ही उन्हात राबतो, घाम गाळतो, पण बाजारात आमच्या मालाची किंमतच राहत नाही. खर्चही निघत नाही. शेती करावी की नाही, हा प्रश्न पडतो.”
ही परिस्थिती केवळ कुसिन्नरपुरती मर्यादित नसून राज्यातील अनेक भागांत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे. शेतकऱ्याच्या घामाला न्याय देण्यासाठी आणि त्याच्या मेहनतीला योग्य भाव मिळवून देण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. त्याच्या कष्टावरच शहरांची पोटे भरतात. मात्र आज त्याच अन्नदात्याच्या आयुष्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतो आहे.
“देवा, या कष्टकरी शेतकऱ्याच्या घामाला न्याय दे… त्याच्या मेहनतीला योग्य भाव दे आणि त्याच्या आयुष्यात थोडा तरी दिलासा दे…” अशीच भावना आज कुसिन्नरच्या शेतकऱ्यांच्या मनात दाटून आली आहे.

संपादक:अरुण चंद्रभान गायकवाड- 9422952513,
उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे- 9637100608

“एवन न्यूज महाराष्ट्र”
सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





