प्रतिनिधी: भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर | ३० एप्रिल २०२६
—————
सिन्नर:तालुक्यातील दूध भेसळ रोखण्यासाठी आणि ग्राहकांना शुद्ध दूध मिळावे यासाठी पंचायत समितीने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला आता त्यांच्या हद्दीतील दूध संकलन केंद्रे आणि डेअरी चालकांच्या हिशोबावर लक्ष ठेवावे लागणार आहे. यासंदर्भात गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी नुकतेच एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले असून, दूध संकलनाची माहिती देणे आता केंद्र चालकांना बंधनकारक करण्यात आले आहे.
सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दूध भेसळ होत असल्याचा संशय व्यक्त केला होता. याविरोधात त्यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. केवळ तक्रार करून न थांबता, प्रत्येक ग्रामपंचायतीने गावातील दूध संकलन आणि वितरणाची माहिती घ्यावी, असा नियम करण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यांच्या या मागणीची दखल घेत प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
या वेळी प्रशासनाने जारी केलेल्या परिपत्रकात प्रामुख्याने चार गोष्टींवर भर देण्यात आला आहे:
दिलेल्या आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या सर्व दूध संकलन केंद्रांकडे आणि डेअरी चालकांकडे वैध परवाना व अधिकृत नोंदणी असल्याची खात्री ग्रामपंचायतीने करायची आहे.
आवक-जावक माहिती (१० दिवसांचा अहवाल):शासनाच्या आदेशानुसार, केंद्रावर किती दूध संकलित झाले आणि किती वितरित झाले, याची लिटरमधील सांख्यिकीय माहिती दर १० दिवसांनी संकलित करणे बंधनकारक आहे. ही माहिती केंद्र चालकांनी ग्रामपंचायतीला सादर करावी लागेल.
जे केंद्र चालक माहिती देण्यास टाळाटाळ करतील किंवा ज्यांच्या कामकाजात संशयास्पद हालचाली आढळतील, त्यांचा अहवाल थेट अन्न व औषध प्रशासन (FDA)विभागाकडे पुढील कारवाईसाठी पाठवण्यात येईल.
तसेच यापुढील काळात होणाऱ्या प्रत्येक ग्रामसभेत दूध भेसळीबाबत जनजागृती करणे आणि आपले गाव ‘भेसळमुक्त’ ठेवण्याबाबतचा ठराव संमत करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
“तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दूध भेसळ माफियांना लगाम घालण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल. ग्रामपंचायतीने सक्रिय सहभाग घेतल्यास सिन्नर तालुका लवकरच भेसळमुक्त होईल.”भाऊसाहेब बैरागी, सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले.
दूध हा जीवनावश्यक घटक असून त्यात होणारी भेसळ अत्यंत घातक आहे. त्यामुळेच आता स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतींना अधिकार देण्यात आले आहेत. केंद्र चालकांनी पारदर्शकपणे व्यवहार करावा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

संपादक: अरुण चंद्रभान गायकवाड- 9422952513 उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे- 9637100608

एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





