best news portal development company in india

भोंदू बाबाच्या समर्थकांचे अंनिसला विकत घेण्याचे धाडस; कृष्णा चांदगुडे यांना लाचेचे आमिष, इंदिरानगर पोलिसांत तक्रार दाखल.!

SHARE:

प्रतिनिधी नाशिक

नाशिक: महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाची चळवळ आणि गेल्या ३५ वर्षांपासून अंधश्रद्धेच्या विरोधात लढा देणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस)” नैतिक अधिष्ठानाला धक्का लावण्याचा प्रयत्न भोंदूगिरी करणाऱ्या टोळीकडून झाला आहे. निफाडमधील भोंदू महेशगिरी बाबाविरुद्धची तक्रार मागे घेण्यासाठी ‘अंनिस’चे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांना लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चांदगुडे यांनी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, लाच देणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे.


   निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील भोंदू महेशगिरी काकडे बाबा याच्यावर अंनिसच्या पुढाकाराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हा भोंदू बाबा गजाआड असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बाबाचा ‘दरबार’ बंद झाल्यामुळे त्याचे नातेवाईक आणि साथीदार धास्तावले आहेत. या कायदेशीर कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी थेट अंनिसच्या कार्यकर्त्यांनाच फोडण्याचा प्रयत्न केला.
    मिळालेल्या माहितीनुसार, भोंदू बाबाच्या भाच्याने एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला मध्यस्थ म्हणून हाताशी धरले. या मध्यस्थीने शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:५६ वाजता कृष्णा चांदगुडे यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. सुरुवातीला किरकोळ बोलणे केल्यानंतर, “महत्त्वाचे बोलायचे आहे, भेटूया का?” अशी विचारणा केली. मात्र, चांदगुडे यांनी भेटीस नकार देऊन फोनवरच बोलण्यास सांगितले.
यावेळी त्या मध्यस्थ व्यक्तीने मूळ हेतू स्पष्ट केला.”बाबाचा भाचा हे प्रकरण मिटवण्यासाठी मोठी रक्कम (पैसे) देण्यास तयार आहे,”असे सांगून चांदगुडे यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला.
   अंनिसच्या ३५ वर्षांच्या निष्कलंक इतिहासावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न होताच कृष्णा चांदगुडे यांनी संबंधित व्यक्तीचा फोनवरच चांगलाच समाचार घेतला. त्यांनी तात्काळ ही बाब संघटनेच्या इतर कार्यकर्त्यांच्या आणि इंदिरानगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर लेखी तक्रार दाखल करण्यात आली.
“आम्ही विकले जाणारे लोक नाही!” – कृष्णा चांदगुडे
या घटनेवर संताप व्यक्त करताना कृष्णा चांदगुडे म्हणाले की,
“लाच घेणे हा जसा गुन्हा आहे, तसाच तो देणे हा देखील गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारांमुळे माझ्या आणि आमच्या चळवळीच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला आहे. आम्ही तत्त्वासाठी लढणारे लोक आहोत, पैशासाठी नाही. भविष्यात अशा भोंदूंनी किंवा त्यांच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांना आमिष दाखवण्याचे धाडस करू नये, हाच संदेश देण्यासाठी मी ही तक्रार दाखल केली आहे.”
इंदिरानगर पोलिसांनी चांदगुडे यांची तक्रार नोंदवून घेतली असून, ज्या मोबाईल क्रमांकावरून फोन आला होता आणि त्यामागे जे मास्टरमाइंड आहेत, त्यांचा शोध सुरू केला आहे. “कायद्याच्या चौकटीत राहून तपास केला जाईल आणि संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
भोंदू बाबाचे नातेवाईक आता पोलिसांच्या रडारवर आले असून, अंनिसने घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये खळबळ माजली आहे.

विशेष प्रतिनिधी, नाशिक.

सत्य ,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी “एवन न्यूज महाराष्ट्र”
संपादक अरुण चंद्रभान गायकवाड- 9422952513,
उपसंपादक ज्ञानेश्वर यशवंत सांगळे – 9637100608

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई