best news portal development company in india

निर्मल गोदावरीसाठी कोपरगावकरांचे श्रमदान: घाटावर स्वच्छता मोहीम, सामूहिक प्रतिज्ञेतून पर्यावरण जागृती…

SHARE:

प्रतिनिधी :निवृत्ती पगार, कोळपेवाडी
कोपरगांव:गोदावरी नदीचे पावित्र्य जपण्यासाठी आणि नदीपात्र प्रदूषणमुक्त करण्याच्या उद्देशाने कोपरगाव नगर परिषद यांच्या वतीने “निर्मल गोदावरी अभियान” अंतर्गत आज गोदावरी घाटावर व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रमदान केले तसेच “निर्मल गोदावरी”ची सामूहिक प्रतिज्ञा घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

रविवार, दि. ५ एप्रिल रोजी आयोजित या उपक्रमात जनसहभागातून सकारात्मक बदल घडवण्याचा निर्धार दिसून आला. शहरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. स्वच्छता मोहिमेदरम्यान घाट परिसरातील कचरा संकलन, प्लास्टिक निर्मूलन आणि परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी नगराध्यक्ष पराग संधान, सर्व माननीय नगरसेवक उपस्थित होते. तसेच गोदामाई प्रतिष्ठान चे आदिनाथ ढाकणे यांनी उपस्थितांना “निर्मल गोदावरी”ची सामूहिक प्रतिज्ञा दिली. नदी स्वच्छता, प्लास्टिकमुक्त परिसर आणि पर्यावरण रक्षणाबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

या उपक्रमामुळे गोदावरी घाट परिसर स्वच्छ झाला असून, नागरिकांमध्ये नदी संवर्धनाबाबत जागरूकता वाढली आहे. “निर्मल गोदावरी अभियान” हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून, सातत्याने राबवायचा लोकसहभागाचा संकल्प असल्याचा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.

संपादक: अरुण चंद्रभान गायकवाड 9422952513 उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे- 9637100608 ,सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी “ए वन न्यूज महाराष्ट्र”
प्रतिनिधी:निवृत्ती पगार
“एवन न्यूज महाराष्ट्र
कोळपेवाडी
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई