प्रतिनिधी नाशिक
दिंडोरी (नाशिक):नाशिक जिल्ह्याला हादरवून टाकणारी एक भीषण घटना शुक्रवारी रात्री समोर आली आहे. दिंडोरी शहरातील शिवाजीनगर परिसरात अनियंत्रित झालेली कार एका उघड्या विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ५ सदस्यांचा समावेश असल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ‘एमएच १५ जेएस १०५३’ या क्रमांकाची कार दिंडोरीमार्गे जात होती. शिवाजीनगर भागात आली असता, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेली ही कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या राजू राजे यांच्या शेतातील विहिरीत जाऊन कोसळली. विहीर उघडी असल्याने आणि त्यात पाणी जास्त असल्याने कार थेट खोल पाण्यात बुडाली.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, रात्रीची वेळ, विहिरीतील खोल पाणी आणि चिखल यामुळे बचाव कार्यात मोठे अडथळे येत होते. दाट अंधारामुळे मृतदेह शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अखेर रात्री उशिरा क्रेन आणि हायड्रा मशीन पाचारण करण्यात आले. पहाटे १ वाजेच्या सुमारास कार विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले आणि सर्व ९ मृतदेह बाहेर काढण्यात आले.

या भीषण अपघातात मृत्यू झालेले सर्व जण दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावचे रहिवासी आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ५ सदस्यांचा समावेश आहे. मृतांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१. सुनील दत्तू दरगोडे२. राखी सुनील दरगोडे३. उषा अनिल दरगोडे ४. श्रद्धा अनिल दरगोडे ५. श्रावणी अनिल दरगोडे इतर ४ मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.
या एकाच घटनेने इंदोरे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उघड्या विहिरींच्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला असून, या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





