प्रतिनिधी: निवृत्ती पगार ,कोळपेवाडी
अहिल्यानगर :जिल्ह्यासह कोपरगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रब्बी हंगामातील काढणीस आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. विशेषतः गहू, कांदा, मका तसेच द्राक्षे व डाळिंब फळबागांना जबर फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

आज दिवसभर तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या नुकसानीच्या घटना समोर आल्या. संसार, वडगाव, चासनळी, बक्तरपूर, वेळापूर, सुरेगाव, रवंदे, धामोरी, मायगाव देवी या गावांमध्ये काढणीस आलेली पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे.
तहसीलदार महेश सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून प्राथमिक पाहणीत अनेक शेतांमध्ये गहू, कांदा, मका तसेच द्राक्ष बागांचे नुकसान स्पष्ट दिसून येत आहे. शेतमाल पाण्यात भिजल्याने व गारपिटीमुळे पिके आडवी पडल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.
दरम्यान, चासनळी येथे भागिनाथ नरहरी देनक यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून मालमत्तेचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी जनावरांच्या मृत्यूच्या घटनाही घडल्या असल्या, तरी कोपरगाव तालुक्यात अशी घटना घडलेली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गातून शासनाकडे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची जोरदार मागणी होत आहे. काढणीच्या उंबरठ्यावर आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, त्वरित मदत न मिळाल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे.


“एवन न्यूज महाराष्ट्र”
कोळपेवाडी
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





