प्रतिनिधी:निवृत्ती पगार ,कोळपेवाडी

पोहेगाव (ता. राहाता) : कुंभारी व पोहेगाव परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम, सुरळीत व उच्च दाबाने होण्यासाठी महत्त्वाची पायाभूत सुविधा उभी राहत असून, पोहेगाव येथे सुमारे 2.60 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या शहा सबस्टेशन ते पोहेगाव सबस्टेशन दरम्यानच्या 33 केव्ही उच्चदाब वाहिनीचे लोकार्पण आज आमदार आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

याचवेळी सुमारे दहा लाख रुपयांच्या निधीतून साकारलेल्या श्री मयुरेश्वर देवस्थान परिसर विकास कामाचाही लोकार्पण सोहळा पार पडला. या कामांमुळे परिसरातील नागरिक, शेतकरी व देवस्थानाला येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
33 केव्ही उच्चदाब वाहिनीमुळे वीजपुरवठ्याची क्षमता वाढणार असून, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात मात होणार आहे. विशेषतः शेतीपंप, घरगुती व व्यापारी वापरासाठी स्थिर व उच्च दाबाने वीज उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांसाठी हे काम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या कार्यक्रमास महावितरण संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, राहाता विभागाचे उपकार्यकारी अभियंता डी. डी. पाटील, राजनगाव देशमुख येथील कनिष्ठ अभियंता श्री टरले, पोहेगावचे कनिष्ठ अभियंता श्री गव्हाळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामपंचायतीचे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कर्मवीर शंकरराव सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, संचालक शंकरराव चव्हाण, राहुल रोहमारे, वसंतराव आभाळे, प्रशांत घुले, गंगाधर अवताडे, माजी व्हाईस चेअरमन काकासाहेब जावळे, सुनील शिंदे, सचिन रोहमारे, किसनजी पाडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजी शिंदे, शरदचंद्र पवार नागरिक पतसंस्थेचे चेअरमन देवेंद्र मारे, गौतम सहकारी बँकेचे संचालक बाबुराव थोरात, बापूसाहेब जावळे, बापूसाहेब वक्ते, उत्तमराव भालेराव, कोपरगाव जिनिंग अँड प्रोसेसिंग सोसायटीचे व्हाईस चेअरमन शंकर गुळसर, गोदावरी खोरे ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक दिलीप शिंदे, प्रदीप कुऱ्हाडे तसेच राजनगाव देशमुखचे सरपंच किरण होन, बादरपूरचे सरपंच गोपीनाथ राहणे, शहापूरचे सरपंच रमेश डांगे, घरचे सरपंच संदीप पवार यांच्यासह पंचक्रोशीतील उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विकासकामांमुळे कुंभारी, पोहेगाव व आसपासच्या गावांना दीर्घकालीन वीज स्थैर्य लाभणार असून, धार्मिक स्थळाच्या सुशोभीकरणामुळे भाविकांसाठीही सुविधा वाढणार आहेत. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी ही कामे मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


एवन न्यूज महाराष्ट्र
कोळपेवाडी
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





