विशेष प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे, शहा,सिन्नर.
सिन्नर:तालुक्यातील शहा येथील जागृत दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या”श्री काळभैरवनाथ महाराजांच्या” यात्रेचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. चैत्र पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आयोजित या यात्रेत भक्तांची अभूतपूर्व मांदियाळी पाहायला मिळाली. श्रद्धेचा आणि परंपरेचा संगम असलेल्या या उत्सवात महिला भाविकांनी लोटांगण घालत आणि पायघड्या घालत आपला नवस पूर्ण केला.
या यात्रेचे औचित्य साधून नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी शहा येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी श्री काळभैरवनाथ महाराजांचे दर्शन घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. या वेळी त्यांच्यासोबत मा. भारत कोकाटे साहेब,संतोषभाऊ भवर,आणि भागातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
‘नवसाला पावणारा देव’ अशी ख्याती असलेल्या भैरवनाथ महाराजांच्या चरणी लीन होण्यासाठी परिसरातील हजारो भाविकांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे, ज्या भाविकांनी महाराजांना नवस बोलला होता, त्यांनी आपल्या घरापासून मंदिरापर्यंत लोटांगण घालून आणि पायघड्या अंथरून आपला नवस फेडला. यामध्ये महिला भाविकांचा सहभाग लक्षणीय होता. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘भैरवनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
यात्रेच्या यशस्वी नियोजनासाठी शहा येथील तरुण ग्रामस्थ मंडळी आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये प्रामुख्याने सदस्यांचे योगदान मोलाचे ठरले असुन काकासाहेब राजगड, संपत म्हस्के,बाळासाहेब भाऊसाहेब मस्के,दादा उर्फ तात्या घोडेगाव,भाऊसाहेब बाबुराव जाधव,राहुल वाकचौरे, गवाजी नाजगड,काशिनाथ दादा जाधव, संजय गोराणे,रावबा तुकाराम जाधव
या मान्यवरांसह गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी यात्रेची व्यवस्था चोख ठेवत भाविकांना सुलभ दर्शन मिळेल याची काळजी घेतली.या यात्रेनिमित्त काढण्यात आलेली महाराजांची पालखी आणि छबिना मिरवणूक हे आकर्षणाचे केंद्र ठरले. गावातील मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत तरुण मंडळाने मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.
“शहा येथील काळभैरवनाथ महाराज हे संपूर्ण तालुक्याचे श्रद्धास्थान आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तांचा उत्साह दांडगा असून, प्रशासकीय आणि ग्रामस्थ स्तरावर सर्व सोयी-सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.— आयोजक समिती, शहा.


Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





